भाजप आमदार लाड यांना एकनाथ खडसेंचा शेलका `प्रसाद` - eknath khadse criticizes bjp MLA Prasad lad in his styale | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

भाजप आमदार लाड यांना एकनाथ खडसेंचा शेलका `प्रसाद`

कैलास शिंदे
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

लाड आता काय उत्तर देणार, याची उत्सुकता. 

जळगाव : भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री ए्कनाथराव खडसे व भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांच्यात जोरदार शाब्दिक युध्द सुरू आहे. मी सहा वेळा जनतेतून निवडून आलो  आहे. प्रसाद लाड यांनी एकदा तरी जनतेतून निवडून यावे, असे खुले आव्हान एकनाथराव खडसे यंनी दिले आहे.

आजवरच्या राजकारणात भाजप संघटन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्य जीवावर निवडून येणारे स्वत:च्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देवून पक्ष त्याग केला, ज्या पक्षाने एवढं दिल, अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येवून पद भोगलीत तेच नेते इतरांना शिकवित आहेत. त्यांच्या पक्षातून जाण्याने भाजपचे कोणतेही नुकसान होणार नाही. जर ते भारतीय जनता पक्षात एवढे ताकदवान होते,तर विधानसभेत आपल्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत, अशी टीका लाड यांनी केली.

आमदार लाड यांच्या या आरोपाला खडसे यांनी आपल्या स्टाईलने तेवढेच कणखरपणे उत्तर दिले, मुक्ताईनगर येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना तेम्हणाल, कि मी जनतेतून तब्बल सहा वेळा निवडून आलो आहे, प्रसाद लाड यांनी किमान एक वेळा तरी जनतेतून निवडून येवून दाखवावे. तसेच मी भारतीय जनता पक्षातून गेल्यावर परिणाम होत नसेल, तरी मी गेल्याचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही असे सतत का म्हणत आहेत. याचे उत्तर लाड यांनी द्यावे.

मुलीच्या पराभवाच्या बाबतीत बोलतांना ते म्हणाले, ‘मुलीचा पराभव करण्यासाठी पक्षातील लोकांनीच पक्षविरोधी काम केले, मुकताईनगरात आपल्या मुलीला पाडण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आतून पाठींबा होता. भारतीय जनता पक्षाची ताकद उत्तर महाराष्ट्रात कमी झाली असून पूर्वीपेक्षा कमी आमदार भाजपचे उत्तर महाराष्ट्रतून निवडून आले आहेत.``

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख