एकनाथ खडसे आज ईडीच्या चैाकशीला उपस्थित राहणार का?

खडसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.
41eknath_20khadsefff_1.jpg
41eknath_20khadsefff_1.jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ते आज ईडीच्या कार्यालयात चैाकशीसाठी उपस्थित राहणार का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. भोसरी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी काल ईडीनं खडसे यांना समन्स बजावले आहे. त्यांना आज सकाळी अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. eknath khadse cancelled press conference over health issue ed summons

एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत टि्वट करुन ही माहिती दिली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत खडसे काय नवीन माहिती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चैाधरी यांना ईडीने काल सकाळी अटक केली आहे. परवा रात्रभर त्याची ईडीकडून कसून चैाकशी केली जात होती. काल सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे. भोसरी जमिन गैरव्यवहारप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. 

भोसरी जमिन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गिरीश चैाधरी यांना अटक झाल्यानंतर आता एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्याला ईडी लावल्यास आपण  सीडी लावू, असा इशारा खडसे यांनी त्यावेळी दिला होता. त्याच्या या विधानाची खूप चर्चा त्यावेळी झाली होती.  खडसे हे जेव्हा महसूलमंत्री होते तेव्हा त्यांनी त्यांनी पती मंदाकिनी व अन्य कुटुबियांच्या नावावर गैरव्यवहार करून भोसरी येथील जमिन विकत घेतली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.  

आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरी येथील जमीन खरेदी केली आहे. मूळ जमीन मालकाकडून ही जमीन 3 कोटी 75 लाख रुपयांना घेण्यात आली.ही जमीन एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे हे दोघे मालक झाले. याच प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर खडसे यांना महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com