नाशिक, नागपूर, जळगावसह  १८ जिल्ह्यासाठी गुडन्यूज.. - Eighteen districts unlocked including Nashik, Nagpur, Jalgaon  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

नाशिक, नागपूर, जळगावसह  १८ जिल्ह्यासाठी गुडन्यूज..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 जून 2021

पॅाझिटिव्ह रेट ५ टक्के आहे, तिथं पूर्णपणे लॅाकडाऊन हटविण्यात येणार आहे

मुंबई : राज्यात ज्या ठिकाणी कोरोनाचे कमी रुग्ण आहेत, तिथं लॅाकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात येणार आहे. तर पॅाझिटिव्ह रेट ५ टक्के आहे, तिथं पूर्णपणे लॅाकडाऊन हटविण्यात येणार आहे, असे मदत, पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. उद्यापासून निर्णय लागू करण्यात येणार आहे. Eighteen districts unlocked including Nashik, Nagpur, Jalgaon 

राज्यात पाच टप्यात लॅाकडाउन हटविणार आहे, पहिल्या टप्यात पूर्ण व्यवहार सुरळीत राहणार आहे. कुठे लॅाक आणि कुठे अनलॅाक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याबाबत त्यांनी ही माहिती दिली. आपत्ती व व्यवस्थापन विभागाने हा निर्णय घेतला आहे. दहावी, बारावी परीक्षांचा रद्द करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितलं.  पहिल्या टप्यात १८ जिल्हे अनलॅाक करण्यात आले आहे. 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, 5 टक्के पॉझिटिव्हीटी रेट आणि 25 टक्के आत ऑक्सिजन बेड ज्या ठिकाणी आहे. अशा ठिकाणी लॉकडाउन राहणार नाही.  पहिल्या टप्यात जमावबंदी राहणार नाही, पॅाझिटिव्ह रेट कमी झाला तर लोकल सुरु होतील. 

हे आहेत अठरा जिल्हे (अनलॅाक)

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा , चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर , नागपूर, नांदेड, नाशिक परभणी,ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ

लेव्हल 2 मधील जिल्हे- 

अहमदनगर, अमरावती, हिंगोली, नंदुरबार, मुंबई आणि मुंबई उपनगर

लेव्हल 3 मधील जिल्हे- 

अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर

लेव्हल 4 चे जिल्हे- 

पुणे, रायगड

रामदेव बाबांना उच्च न्यायालयाने फटकारले..चुकीच्या विधानाबाबत नोटीस..

नवी दिल्ली :  अँलोपॅथीवरुन सुरू असलेला वाद आता दिल्ली उच्च न्यायालायात गेला आहे. रामदेव बाबा यांच्याविरोधात दिल्ली मेडिकल असोसिएशनने (DMA)याचिका दाखल केली आहे. पंतजलीच्या कोरोनील बाबत रामदेव बाबांनी केलेल्या चुकीच्या दावा आणि अँलोपॅथीबाबत केलेल्या चुकीच्या विधानाबाबत ही याचिका दाखल करण्यात आली. याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्चन्यायालयाने रामदेव बाबांना नोटीस बजावली आहे. याबाबत उत्तर मागितलं आहे. "कोरोनीलचा प्रचार करा पण अँलोपॅथीबाबत चुकीचे विधान करु नका," असे न्यायालयाने रामदेव बाबांना सुनावले. दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकेच्या सुनावणीत 'डिएमए'ला सांगितले की, न्यायालयात वेळ घालविण्याबाबत तुम्ही कोरोनाला रोखण्यासाठी संशोधन करण्यात वेळ घालवा. यावर डिएमएने न्यायालयात सांगितलं की कोरोनावर कोरोनील हे रामबाण उपाय असल्याचा रामदेव बाबा दावा करीत आहेत. यावर न्यायालयाने त्यांना सुनावले की तुम्हीच सांगितलं की कोरोनील बाबतचा दावा चुकीचा आहे, तर तुम्ही कशाला त्याचा विचार करता. कोरोनावर उपाय करण्यासाठी कोरोनील योग्य की अयोग्य हे वैद्यकीय तज्ज्ञ ठरवितील, 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख