मोठी बातमी : मुलासह अनिल देशमुख यांना पुन्हा ED चे समन्स  - ED summons Anil Deshmukh to appear on July 5  | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : मुलासह अनिल देशमुख यांना पुन्हा ED चे समन्स 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 4 जुलै 2021

या आधी दोन वेळा देशमुखांनी चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचे ईडीला कळवले होते.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. देशमुख यांना ५ जुलै रोजी ED च्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. यावेळी त्यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांना देखील समन्स बजावण्यात आले असून त्यांना अनिल देशमुखांनंतर ६ जुलै रोजी ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. (ED summons Anil Deshmukh to appear on July 5)  

त्यानंतर ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी सुरू केली आहे. या आधी दोन वेळा देशमुखांनी चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचे ईडीला कळवले होते. त्यानंतर पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहे. दुसऱ्या समन्सवेळी कोणत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे? प्रकरण नेमके  काय आहे? नेमकी कोणती कागदपत्रे हवी आहेत? हे स्पष्ट होत नाही तोवर तपास प्रक्रियेस सहकार्य करणे शक्य नाही, अशी भूमिका देशमुख यांनी सक्तवसुली संचलनालयाला(ईडी) पत्राद्वारे कळविली होती. त्याआधी पहिल्या समन्सवेळी देखील अनिल देशमुख यांनी चौकशीस हजर राहू शकणार नसल्याचे सांगितले होते.  

हेही वाचा :...म्हणून मी गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड टाकला

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “मुंबईतल्या हॉटेल, बार, पब, रेस्टॉरंटकडून महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दिलं होतं” असा आरोप परमबीरसिंह यांनी केला होता. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. त्यासंदर्भात ईडीने अनिल देशमुख यांच्या घरांवर छापे टाकल्यानंतर आता त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.   

हेही वाचा : भापजची खेळी फेल करण्यासाठी ठाकरे सरकारचा हा प्लॅन

दरम्यान, देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे Sanjeev Palande व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडी विशेष न्यायालयाने येत्या ६ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विशेषकरून बदल्यांमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांची भूमिका होती, असे त्यांचा संजीव पलांडे याने सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात सांगितल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे.  

Edited By - Amol Jaybhaye   

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख