देशमुखांनंतर आता अनिल परबांची अशीच अवस्था होणार! - ED raids Anil Deshmukh house Kirit Somaiya Reaction  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

देशमुखांनंतर आता अनिल परबांची अशीच अवस्था होणार!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 जून 2021

छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्यामुळे ३ वर्ष जेलमध्ये होते.

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आज सकाळी ईडीकडून कारवाई करण्यात आली. यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भूजबळ यांच्यावर मागे झालेल्या कारवाईची आठवण करुन दिली आहे. याबाबत सोमय्यांनी टि्वट केलं आहे. ED raids Anil Deshmukh house Kirit Somaiya Reaction

आपल्या टि्वटमध्ये किरीट सोमय्या म्हणतात, ''अनिल देशमुखचा घरी आज ED ई डी चे छापे काही दिवसांनी जेल मध्ये त्यांची रवानगी होणार आहे. घोटाळ्याचा पैसा कोलकत्ता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्यामध्ये वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्यामुळे ३ वर्ष जेलमध्ये होते. काही दिवसांनी अनिल परबची अशीच अवस्था होणार आहे.'' 

अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावर ईडीने आज सकाळी पुन्हा छापा मारला. त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात येत आहे.  त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.  महिन्याभरात ही दुसरी कारवाई आहे.  

या प्रकरणात या पूर्वीही सीबीआयने गुन्हा नोंदवला होता. १०० कोटी वसूलीबाबत ईडीही तपास करत होती. याच प्रकरणात हा गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार ईडी चौकशीसाठी देशमुख यांना समन्स करू शकते. अनिल देशुख यांच्या भष्ट्र पद्धतीबाबत आपल्याला बळीचा बकरा बनविला गेले, असा आरोप परमबीरसिंह यांनी केला आहे. सीबीआय अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर व कार्यालयावर छापा टाकला होता. यात त्यांना काही कागदपत्रात अफरातफर केल्याचे आढळले होते. ईडीकडून अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

''हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे.'' असे काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले होते.

 Edited by : Mangesh Mahale  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख