शिवसेनेमुळेच भाजपला नीतीशकुमारांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावे लागले  - Due to Shiv Sena, BJP had to declare Nitish Kumar as the Chief Minister | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

शिवसेनेमुळेच भाजपला नीतीशकुमारांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावे लागले 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

नीतीशकुमारांना जसा शब्द दिला होता, तसा महाराष्ट्रातसुद्धा हा शब्द दिला होता.

मुंबई : "नीतीशकुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार, असे भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते म्हणत होते. त्याबद्दल नीतीशकुमारांनी शिवसेनेला धन्यवाद द्यायला हवेत. महाराष्ट्रात भाजपने जो काही खेळ केला आणि त्यावर शिवसेनेने जो पलटवार केला. त्यामुळेच भाजपला नीतीशकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावे लागले,' असा दावा शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी केला. 

बिहार विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीचे कल स्पष्ट होत असताना राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील दावा केला. ते म्हणाले की बिहारमधील मतमोजणी प्रक्रिया खूप संथ गतीने सुरू आहे. सर्व निकाल अद्याप समोर आलेले नाहीत. रात्री 10-11 पर्यंत निकाल स्पष्ट होईल.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयू पक्ष तिसऱ्या नंबरवर आहे. बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तीनवेळा राहूनही त्यांचा पक्ष तीन नंबरवर जात असेल, तर त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. त्यांचे सरकार फेल गेले आहे, हेच यातून समोर आले आहे. 

तेजस्वी यादव यांच्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, कुटुंब, इतरांची साथ नसताना एक तीस वर्षांचे तरुण तेजस्वी हे 
पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्र सरकारमधील मंत्र्यांविरोधात लढले. भाजप जरी एक नंबरवर असला तरी या सामन्याचे "मॅन आफ द मॅच' मात्र तेजस्वी यादव हेच आहेत. या निवडणुकीतून तेजस्वी हे राष्ट्रीय राजकारणातील एक चेहरा म्हणून समोर आले आहेत. कुणाचाही सपोर्ट नसताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते एकटे लढले. 

नीतीशकुमारांना जसा शब्द दिला होता, तसा महाराष्ट्रातसुद्धा हा शब्द दिला होता. त्यांच्या उलट्या पालट्या झाला. पण, त्यानंतर शिवसेनेने जी भूमिका घेतली, त्यामुळे शब्द फिरविण्याची शक्‍यता होणार नाही. काय होऊ शकते, हे महाराष्ट्राने, शिवसेनेने देशाला दाखवून दिले आहे. त्यामुळे कमी जागा येऊनसुद्धा नीतीशकुमार मुख्यमंत्री झाले, तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे, असे राऊत यांनी नमूद केले. 

बिहार निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाच्या कामगिरीबाबत राऊत यांनी सांगितले की, बिहारच्या निवडणुकीत कॉंग्रेसला अधिक चांगली कामगिरी करता आली असती, तर आतापर्यंत तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख