पुन्हा लॉकडाउन नको..लशीकरणावर भर द्या...

"पुन्हा लॉकडाउन करून लोकांना त्रास देऊ नका," असे कॅाग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी सांगितले.
sanjay30.jpg
sanjay30.jpg

मुंबई : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाउनबाबत चुकीचे नियोजन करीत आहे्त. लॉकडाउनमुळे याआधी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, लोक बेरोजगार झाले. व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन लावून लोकांना त्रास देऊ नका," असे कॅाग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी आज सांगितले.

नांदेडमध्ये झालेल्या हिंसाचाराचा संजय निरूपम यांनी निषेध केला. ते म्हणाले, "कोरोनाच्या नावाखाली नांदेड येथे सुरू असलेला पारंपरिक सण रोखण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जबरदस्तीने लोकांना रोखू शकत नाही. पोलिसांवर हल्ला करणे हे चुकीचे आहे. कारण ते त्यांचे कर्तव्य बजाबत आहेत. कोरोनाच्या नावाखाली सरकारने अशा पद्धतीने नागरिकांशी व्यवहार करू नये." 

निरूपम म्हणाले, "मुंबईत पुन्हा लॅाकडाउन नको व्हायला पाहिजे. गेल्या वर्षी ज्या पद्धतीने लॅाकडाउन करण्यात आले, त्यामुळे कोरोनाही वाढला, आणि संपूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस आली. मोठ्या प्रमाणात मजूरांचे स्थलांतर झाले. गेल्या लॅाकडाउनमध्ये आपल्याकडे लस उपलब्ध नव्हती, आता लस उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना लस कशी देता येईल. याचा विचार सरकारने केला पाहिजे. जास्तीत जास्त नागरिकांनी लशीकरण कसे करता येईल, याचा विचार सरकारने केला पाहिजे."

कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी सावधानी, खबरदारी घेतली पाहिजे, शिवाय लशीकरणावर भर दिला पाहिजे. मुंबईत लसीकरण केंद्र वाढविणे गरजेचे आहे. "मिशन टेस्टिंग" ही बकवास आयडिया आहे." कॅाग्रेस पक्षाने सुद्धा लॉकडाउनच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

हेही वाचा : "मंत्रिमंडळात विरोध होत असला तरी परिस्थिती पाहून लॅाकडाउनचा निर्णय..."
मुंबई : "मंत्रिमंडळात विरोध होत असला तरी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागेल," असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. "अर्थचक्रही चाललं पाहिजे आणि जीवही वाचला पाहिजे, त्यामुळे मध्यबिंदू गाठावा लागतो आणि परिस्थितीनुसार योग्य निर्णय घ्यावा लागतो," असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

राजेश टोपे म्हणाले, "कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. काही शहरात बेड्स उपलब्ध नाहीत ही वस्तूस्थिती आहे. काही ठिकाणी रुग्णालयात बेड मिळतच नाही असं नाही. कालच्या बैठकीत खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड ताब्यात घेतले पाहिजे, ज्यामुळे बेड कमी पडणार नाही. 80 टक्के ऑक्सिजन सिलेंडर्सचा वापर मेडिकल कारणांसाठी केला जावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com