राणेंच्या नादाला लागू नका ; अन्यथा... 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मला बोलण्यात अजिबात स्वारस्य नाही. कारण त्यांनी तोंड उघडल्यावर फक्त घाणच बाहेर पडते, अशी खोचक टीका शिवसेना नेते, माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केली होती. त्यावर नीलेश राणे यांनी जाधव यांचा चांगलाच समाचार घेताल.
Bhaskar Jadhav, Nilesh Rane jpg
Bhaskar Jadhav, Nilesh Rane jpg

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मला बोलण्यात अजिबात स्वारस्य नाही. कारण त्यांनी तोंड उघडल्यावर फक्त घाणच बाहेर पडते, अशी खोचक टीका शिवसेना नेते, माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केली होती. त्यावर नीलेश राणे यांनी जाधव यांचा चांगलाच समाचार घेताल. टि्वटरवरुन भास्कर जाधव हा परत एकदा राणेंवर बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करताना तोंडावर आपटला, असा टोला लगावला आहे. 

नीलेश राणे आपल्या टि्वटमध्ये म्हणाले की, शिवसेना ''आमदार वाळू चोर भास्कर जाधव हा परत एकदा राणेंवर बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करताना तोंडावर आपटला. भास्करला त्याच्या स्वतःच्या गावाच्या कार्यक्रमामध्ये कोण बोलवत नाही म्हणून हा स्वतःच्याच गावामध्ये शिवीगाळ करतो तरी त्याची दखल न घेता गावातले त्याला फाट्यावर मारतात''. असे नीलेश राणे यांनी म्हणाले आहेत. 

''स्वतःच्या कार्यकर्त्यांना दारू विकायला सांगणारा हा भास्कर जाधव, हे वाक्य भरसभेत बोलले आहेत. तुमचे सर्व कारनामे राणे साहेबांना माहीत आहेत, त्यामुळे उगाच त्यांचा नादाला लागू नका, आता एक पायाने लंगडा आहे, नंतर काय होईल सांगता येत नाही'', असेही राणे म्हणाले आहेत. 

'याच लंगड्या भास्कर ने आपल्या गावात किती ग्रामपंचायत आणल्या ते सांगावे. राणे साहेबानी ९०% ग्रामपंचायत ताब्यात घेतल्या, त्यांचा आदर्श घ्या', असा सल्ला देखील नीलेश राणे यांनी जाधवांना दिला आहे. 

राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल काल जाहीर झाले. निकालावरुन आता राज्यातील राजकाण चांगलेच तापले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच नंबर वन असल्याचे भाजपेने म्हटले आहे. तर, महाविकास आघाडीने सर्वाधीक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. कोकणामध्ये भाजपच नंबरवन असल्याचा दावा राणे यांनी केला होता. त्यावरुन जावध यांनी त्यांना लक्ष केले होते. 

भास्कर जाधव काय म्हणाले होते? 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मला बोलण्यात अजिबात स्वारस्य नाही. कारण त्यांनी तोंड उघडल्यावर फक्त घाणच बाहेर पडते, कोकणातील जनतेने त्यांना केव्हाच त्यांची जागा दाखवली आहे. कोकणात त्यांचे अस्तित्व कधीच संपलं,  

भास्कराव जाधव काल नाशिकच्या दौर्यावर होते. त्यावेळी ते म्हणाले, शिवसेनेला ग्रामीण भागात मोठा जनाधार आहे. ते भाजपची संस्कृती विसरून बेछूट आरोप करताय हे चुकीचं आहे.  शरद पवार यांच्याविषयीचे वक्तव्य हा भाजपचा बेशरमपणा आहे. हे असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते करताय हे अत्यंत अयोग्य आहे. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी संबंधीत प्रश्नावर ते म्हणाले, कोकणात भाजपहा पक्ष नावाला शिल्लक नाही. भाजपला एकाही गावात यश आलेले नाही. कोकणात भाजपनं मुसंडी मारलेली नाही. याविषयीचा जो दावा केला जातो तो निरर्थक आहे. राज्यात प्रत्येक ठिकाणी फक्त महाविकास आघाडीलाच यश मिळाले आहे.  

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com