मेहुल चोकसीच्या जीवाला धोका..प्रत्यार्पणाचा आज फैसला.. - dominica court to give decision today on mehul choksi regarding come back to india | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

मेहुल चोकसीच्या जीवाला धोका..प्रत्यार्पणाचा आज फैसला..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 जून 2021

मेहुल यांची याचिका सुनावणीसाठी लायक नसल्याचे काल डोमिनिका सरकारने न्यायालयात सांगितले.  

नवी दिल्ली  पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील आरोपी, हिऱ्यांच्या व्यापारी मेहुल चोकसी यांच्या जीवाला धोका असल्याचे त्याने डोमिनिकाच्या न्यायालयात सांगितले. मेहुल चोकसीने न्यायालयात सांगितले, "डोमिनिका येथील पोलिस कोठडीत मी सुरक्षित नसून ऍटिगुआ येथे परत जाण्यासाठी जो खर्च येईल तो देण्यास मी तयार आहे." आज त्यांच्या प्रत्यार्पणाबाबत सुनावणी होणार आहे.  dominica court to give decision today on mehul choksi regarding come back to india

डोमिनिकाच्या न्यायालयात काल या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्या असून त्यावर आज निर्णय देण्यात येणार आहे. त्याला बेकायदा डोमिनिकामध्ये प्रवेश केल्याप्रकरणी काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.  मेहुल यांची याचिका सुनावणीसाठी लायक नसल्याचे काल डोमिनिका सरकारने न्यायालयात सांगितले. त्याला भारताकडे सोपवावे, असे डोमिनिका प्रशासनाने सांगितले आहे.  

मेहुल चोकसीची पत्नी प्रीति चोकसीने सांगितले की, मेहुलच्या जिवाला धोका आहे. प्रीतिने डोमिनिकाच्या सुमद्रकिनाऱ्यावर मेहुलसोबत दिलेल्या त्याच्या कथित गर्लफ्रेण्डसंदर्भातही महत्वाचा खुलासा केलाय. मेहुलला अटक करण्यात आली त्या दिवशी काय घडलं यासंदर्भातही प्रीतिने सविस्तरपणे भाष्य केलंय.   प्रीतिला मुलाखतीदरम्यान मेहुल यांच्यासोबत नाव जोडलं जाणाऱ्या मुलीसंदर्भात म्हणजेच बारबरा जैबरिकासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना, “मला माहितीय की मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ती अँटिग्वा आली होती. तेथील बेटांवरील आमच्या दुसऱ्या घरीही ती येऊन गेली होती. तेथील स्वयंपाक्यासोबत तिची चांगली मैत्री झाली होती,” असं प्रीतिने सांगितलं. प्रीती चोकसीने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे.  

सध्या मेहुल हा डॅामिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे. तो कारागृहात असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी सांगितले की चोकसीला दक्षिण डॅामिनिका येथून पकडण्यात आले. या ठिकाणी एकही विमानतळ नाही, चोकशी हा या ठिकाणी बोटीतून आला असावा. त्याला कैनफील्ड येथील किनाऱ्यावर पकडण्यात आले.  ज्यावेळी मेहुल चोकसीला पकडण्यात आले तेव्हा तो समुद्रात महत्वाची कागदपत्रे नष्ट करीत होता. हे डॅामिनिका पोलिसांनी पाहिले असता, त्यांना संशय आला. पोलिसांनी यांनी त्याला याबाबत विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. मेहुल चोकसी या बोटीतून डॅामिनिका येथे आला होता. तेथून तो क्यूबा येथे पळून जाण्याच्या बेतात होता, असे चैाकशीत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.  
 
मेहुल चोकसी यांच्या भारत प्रत्यार्पणासाठी आज डोमिनिका येथे सुनावणी होत आहे. मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणाचा निर्णय झाला तर त्याला भारतात आणण्याची जबाबदारी सीबीआयकडे आहे. सीबीआयच्या सहा अधिकाऱ्यांचे पथक डोमिनिका येथे गेले आहे. या पथकाचे नेतृत्व शारदा राऊत या करीत आहेत. शारदा राऊत या महाराष्ट्राच्या २००५ च्या आयपीएस अधिकारी आहेत. 

पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहाराच्या तपासात शारदा राऊत यांची महत्वाची भूमिका आहे. मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणासाठी त्या डोमिनिका येथे गेल्या आहेत. चोकसीच्या प्रत्यार्पणाचा निर्णय झाला तर त्याला प्रायव्हेट जेटव्दारे नवी दिल्लीत आणण्यात येणार आहे. चोकसीला भारतात आणण्यासाठी या सीबीआयच्या पथकाने अनेक वेळा डोमिनिका प्रशासनासोबत बैठक घेऊन चर्चा केली आहे. 

आज डोमिनिकाच्या न्यायालयात मेहुलच्या विरोधात ईडीनं सादर केलेले दोषारोपपत्र सादर करण्यात येणार आहे. या दस्ताऐवजाच्या आधारे तो भारताचा नागरिक आहे, म्हणून त्याचे प्रत्यार्पण करावे, अशी मागणी न्यायालयात करण्यात येणार आहे. "आपल्या ताब्यातील व्यक्ती मेहुल चोकसी ही जानेवारी २००८ पासून भारतातून पळून गेली आहे.  तिचे प्रत्यार्पण लवकर करावे," अशी मागणी ईडी आणि सीबीआय आज न्यायालयात करणार आहे. 
Edited by : Mangesh Mahale   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख