कोरोना रुग्णसेवा करूनही 'या' डॅाक्टरांच्या विद्यावेतनात फरक का ?  

महापालिका रुग्णालयांत कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स संस्थेत पदव्युत्तर पदविका पूर्ण करणारे डॉक्‍टर कोव्हिड- 19 रुग्णांची सेवा करत आहेत.
Doctor2
Doctor2

मुंबई : मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई कोरोना रूग्णांची राजधानी बनत आहे. राज्यातील महापालिका रूग्णालयांतील निवासी डॅाक्टरासह पदव्युत्तर पदविका पूर्ण करणारे डॉक्‍टरही कोरोना रूग्णांची सेवा करीत आहेत. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातच या डॅाक्टरांच्या विद्यावेतनात भेदभाव असल्याने सीपीएस डॉक्‍टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका रुग्णालयांत कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स संस्थेत पदव्युत्तर पदविका पूर्ण करणारे डॉक्‍टर कोव्हिड- 19 रुग्णांची सेवा करत आहेत. 


इतर निवासी डॉक्‍टरांप्रमाणेच पदव्युत्तर पदविका करणारे निवासी डॉक्‍टर सक्षमपणे सेवा देत आहेत. रूग्णालयांच्या विविध विभागांमध्ये 24 तास कोराना रूग्णांची काळजी घेत आहेत. अशा परिस्थिती असतानाही हा भेदभाव कशासाठी करण्यात येतो, असा सवाल या डॅाक्टरांनी केला आहे.  काही दिवसापूर्वी सरकारने निवासी डॉक्‍टरांचे विद्यावेतन 10 हजार रुपयांनी वाढवून 64 हजार रुपये केले आहे. इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये विद्यावेतन मिळते, तर सीपीएस निवासी डॉक्‍टरांचे विद्यावेतन केवळ 14 हजार 800 रुपये आहे. याबाबत सीपीएस निवासी डॉक्‍टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यावेतन वा वेतनापोटी मुंबई महानपालिकेच्या रुग्णालयातील एमडी/ एमएस/ डीएनबी आदी अभ्यास करणारे निवासी डॉक्‍टर, वैद्यकीय अधिकारी, हाऊस ऑफिसर यांना दरमहा किमान 54 हजार रुपये विद्यावेतन मिळते. मात्र आम्हाला फक्त 14 हजार 800 रुपये विद्यावेतन का दिले जाते, असा सवाल सीपीएस डॉक्‍टर करीत आहेत. 


महापालिकेचा दुटप्पीपणा 

डॉ. अक्षयकुमार मरगळे, उपाध्यक्ष, असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्‍टर्स ऑफ सीपीएस म्हणाले, की कामाचा काहीच अनुभव नसलेल्या इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये विद्यावेतन, इतर निवासी डॉक्‍टरांना 64 हजार रुपये वेतन आणि सीपीएस निवासी डॉक्‍टरांना केवळ 14 हजार 800 रुपये विद्यावेतन हा महापालिकेचा दुटप्पीपणा आहे.

समान काम- समान वेतन या संवैधानिक अधिकारानुसार आम्हालाही 50 हजार रुपये विद्यावेतन द्यावे आणि शक्‍य असल्यास थकबाकी द्यावी. सध्याच्या महागाईच्या काळात 14 हजार 800 रुपयांचे मासिक विद्यावेतन स्वतःचा आणि कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे नाही. 

डॉ. अक्षय गवई, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्‍टर्स ऑफ सीपीएस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com