केंद्र सरकार सांगेल तशी आम्ही शेती करायची का ? राजू शेट्टींचा सवाल 

महाराष्ट्रातील एखाद दुसरी संघटना सोडल्यास सर्वच शेतकरी संघटना आजच्या भारत बंदमध्ये सहभागीअसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे यांनी दिली.
केंद्र सरकार सांगेल तशी आम्ही शेती करायची का ? राजू शेट्टींचा सवाल 

मुंबई : कृषी विधेयकाविरोधात देशभरातील शेतकरी आज रस्त्यावर उतरला असून केंद्रातील मोदी सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आपला आवाज बुलंद केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरात कृषी विधेयकाची होळी करण्यात आली आहे. स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी कृषी विधेयक जमीन गाडून निषेध केला. 

केंद्र सरकार सांगणार आणि आम्ही तशी शेती करणार का ? असा सवाल करून नव्या विधेयकाने शेतकरी देशोधडीला लागेल. नव्या विधेयकामुळे बाजार समित्यांचे अस्तीत्वही नष्ट होणार असल्याची भितीही व्यक्त करण्यात येत आहे. 

महाराष्ट्रातील एखाद दुसरी संघटना सोडल्यास सर्वच शेतकरी संघटना आजच्या भारत बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे यांनी दिली.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर शेतकरी कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांसाठी आणलेले विधेयक अन्याय करणारे असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे असेही त्यांनी सांगितले. 

 दरम्यान, शेट्टी यांच्या हस्ते कोल्हापुरात कृषी विधेयकाची होळी करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनी कृषी विधेयकाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. तर सत्ताधारी शिवसेनेने मात्र मोदी सरकारची कृषी विधेयकाचे स्वागत केले आहे. काही असले तरी शेतकरी संघटनांनी कृषी विधेयकाला विरोध कायम ठेवला आहे. 

दरम्यान, पंजाब, हरियाणा तसेच उत्तर भारतातील शेतकरी अधिकच आक्रमक झाले असून गेल्या तीन दिवसापासून शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडले आहे. महामार्ग, रेल्वे मार्गावरही शेतकरी आंदोलन करीत आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी आंदोलकांना सांगितले, की कुठेही कायदा सुव्यवस्थेला बाधा येणार नाही हे पाहतानाच शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे आणि कोरोनाचा काळ असल्याने सोशल डिस्टिनिंगचेही पालन करावे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com