उपगृह कर्मचाऱ्यांनी काय आकाशात उडत यायचे का ? ठाकरे सरकारला यांनी केला सवाल  - Do satellite staff fly in the sky? Thackeray questioned the government | Politics Marathi News - Sarkarnama

उपगृह कर्मचाऱ्यांनी काय आकाशात उडत यायचे का ? ठाकरे सरकारला यांनी केला सवाल 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

राज्यातील अनलॉक 5 सुरू होणार आहेत.

मुंबई : अनलॉक 5 सुरू होणार आहेत. उपगृहात काम करणाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय केली आहे, की त्यांनी आकाशात उडत यायचे असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. 

मुंबई महापालिकेचा कारभार असो की मुसळधार पावसाने मुंबईचं तुंबण असो देशपांडे हे शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवित असतात. मुंबईतील पावसानंतर मुंबईकरांचे जे हाल झाले होते त्यावरून त्यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका करून त्यांची बोलती बंद केली होती. आता त्यांनी थेट ठाकरे सरकारवच टीका केली आहे. 

राज्यातील अनलॉक 5 सुरू होणार आहेत. उपगृह सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले आहेत. उपगृह सुरू होणार आहेत. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय ? की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचे का ? असे देशपांडे यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे. 

राज्य शासनाने उपगृह सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत.ती अंतिम झाल्यानंतर उपगृह सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील उपगृह व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली, 

कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात उपगृह व्यवसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.आजही कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही त्यामुळे कोरोनासोबत जगतांना अत्यंत काळजीपुर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पाऊले टाकायला सुरुवात केली आहे असेही त्यांनी म्हटले होते. 

एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही उपगृहसाठीची रेसीपी आहे... आपले नाते विश्वासाचे असल्याचेही सांगतांना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेऊन यात सहभागी होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. 

उपगृह सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकेत दिल्यानंतर संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. उपगृहातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नावर त्यांनी काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यांच्या वाहतूक व्यवस्थेचे काय करणार हा ही प्रश्‍न आहे असे त्यांना वाटते. सरकार याबाबत काय करणार आहे की त्यांनी आकाशात उडत यायचे असा सवालही त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख