धनंजय मुंडे आणि ती महिला सामंजस्याने वाद सोडविणार... - Dhananjay Munde and the woman will resolve the dispute amicably | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडे आणि ती महिला सामंजस्याने वाद सोडविणार...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 28 जानेवारी 2021

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेनं आप-आपसातील वाद मध्यस्थीच्यामार्फत सामंजस्यानं सोडवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेनं आप-आपसातील वाद मध्यस्थीच्यामार्फत सामंजस्यानं सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. तसे हमीपत्र गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. या संबंधातून धनंजय मुंडे यांना दोन मुलं असून त्यांना त्यांच्या कुटुबियांची मान्यता असल्याचे मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी सोशलमाध्यमांवर पोस्ट लिहून सांगितले होते. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती ए. के. मेनन यांच्यापुढे झाली. 

या महिलेनं तिचे व धनंजय मुंडे यांचे काही खाजगी फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर जाहीर केले होते. त्यामुळे डिसेंबर २०२० मध्ये धनंजय मुंडेंनी या महिलेविरोधात धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात मानहानीचा दावा केला होता. यात त्यांनी या महिलेकडनं नुकसान भरपाईचीही मागणी केली होती. मात्र अंतरीम दिलासा मिळताना मुंडे यांनी नुकसान भरपाईची मागणी मागे घेत केवळ या महिलेला भविष्यात अशा प्रकारच्या पोस्ट समाज माध्यमांवर करण्यापासून रोखण्याच निर्देश देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत हायकोर्टानं या महिलेला अशा प्रकारच्या पोस्ट करण्यास मनाई केली होती.

गुरूवारी न्यायालयात या दोन्ही बाजूंनी आप-आपसातला वाद मध्यस्थाच्या माध्यमातून सोडवण्यास तयारी असल्याचं हमीपत्र उच्च न्यायालयात सादर केलं. या मध्यस्थाचा सारा खर्च धनंजय मुंडे करणार असल्याचंही या हमीपत्रात म्हटलेलं आहे. डिसेंबर महिन्यात हा दावा मुंडे यांनी उच्च न्यायालयात केल्यानंतर या महिलेच्या बहिणीनं धनंजय मुंडेवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दिली होती.

या आरोपामुळे राज्याचे राजकारण ढवळून निधाले होते. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, या महिलेने तक्रार मागे घेत असल्याचं पोलिसांना लेखी कळवलं होतं. त्यामुळे या प्रकरणात मुंडे यांना दिलासा मिळाला आहे.   

हे हि वाचा..

मुंडे झाले भावनिक अन् म्हणाले, उपकाराची परतफेड अंगावरील कातड्याची जोडे करून होणार नाही!
 
बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झााल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यांच्यावर समाज माध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या, अखेर धनंजय मुंडेंनी या सर्व प्रकरणावर मौन सोडलं आहे. ते बीड येथील एका कार्यक्रमात बोलत होते. 

एखाद्या भगवंताचा प्रसाद असतो, तसे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, अशा कठीण प्रसंगामध्ये आपण सर्वांनी माझ्या पाठीशी साथ उभी केली. मी शब्दात आभार मानू शकत नाही. आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरील कातड्याची जोडे करून जरी आपल्याला घातली तरीही ती फिटू शकत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले. 

आजपर्यंत अनेक संकटाला सामोरे गेलो. सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आज इथपर्यंत पोहोचलो. जीवनामध्ये मी कोणाचेही मन दुखवून स्थान निर्माण केले नाही. मन जिंकून मी स्थान निर्माण केलंय. मी आपले सुद्धा मन जिंकले म्हणून आपण माझ स्वागत केल, असंही धनंजय मुंडे म्हणाले. 
 

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख