तौते वादळाचा धोका असताना संजय पांडे चंदिगढला गेलेच कसे ? शिवसेनेचा सवाल..

परवानगी न घेताच पांडे चंदिगढला सुट्टीवर गेले आहेत.
Sarkarnama Banner - 2021-05-17T162914.576.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-17T162914.576.jpg

मुंबई : एकीकडे महाराष्ट्रावर तौते चक्रीवादळाचा सावट असताना. पोलिस महासंचालक संजय पांडे Sanjay Pandey माञ सुट्टीवर गेले आहेत. तौते चक्रीवादळा इशारा वेध शाळेने काही दिवस आधीच दिला होता, तरीही संजय पांडे सुट्टीवर गेल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.  संजय पांडे यांच्या वर्तणुकीवर शिवसेना नाराज असून कारवाईची मागणी केली जात आहे.  पांडे परवानगी न घेताच चंदिगढला सुट्टीवर गेले आहेत. पांडे सुटीवर कोणत्या कारणामुळे गेले, हे कळालेले नाही. DGP Sanjay Pandey on Chandigarh Holiday Maharashtra faces Tauktae Cyclone Shiv Sena upset

राज्य सरकारने माजी पोलिस आयु्क्त परमबीरसिंह यांचीही चौकशी करावी, असा आदेश सरकारने दिला होता. तेव्हाही आपण ती चौकशी करणार नसल्याचे पांडे यांनी सरकारला कळविले होते. परमबीरसिंह यांनी पांडे यांनी धमकाविल्याचा आऱोप उच्च न्यायालयात केला होता. त्यामुळे पांडे यांनी चौकशीस नकार दिल्याचे पुढे आले होते. आणीबाणीच्या वेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी यांना सुटीवर जाता येत नाही. तरीही पांडे सुटीवर कोणत्या कारणामुळे गेले, हे कळालेले नाही. या चक्रिवादळाचा तडाखा कोकण पट्टीला बसला आहे. तेथील पोलिस व प्रशासन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळणारे संजय पांडे हे राज्यात तौते चक्रीवादळाचा धोका असताना विनापरवानगी चंदिगढला गेलेच कसे ? असा सवाल शिवसेनेकडून विचारला जात आहे. संजय पांडे यांच्या वर्तणुकीवर शिवसेना नाराज आहे.  संजय पांडे यांच्यावर तातडीनं कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने केल्याचे समजते. 
 
मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 
 
बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. या पत्रात संजय पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली होती. आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही, असंही त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com