सचिन तेंडुलकर यांचा असा, अपमान महाआघाडीचे नेते सहन करणार का?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला संदर्भात पाॅप स्टार रिहानाने केलेल्या ट्विटला अप्रत्यक्षपणे उत्तर सचिनने आपल्या ट्विटमधून दिलं होत.
 Devendra Fadnavis question as to why Sachin Tendulkar tolerates such insults .jpg
Devendra Fadnavis question as to why Sachin Tendulkar tolerates such insults .jpg

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला संदर्भात पाॅप स्टार रिहानाने केलेल्या ट्विटला अप्रत्यक्षपणे उत्तर सचिनने आपल्या ट्विटमधून दिलं होत. त्यानंतर इतरही अनेक सेलिब्रटींनी इंडिया दुगेदर म्हणत सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले. त्यानंतर, सचिनला ट्विटरवर ट्रोल करण्यात आलंय. केरळमधील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टरला काळे तेल वाहून त्याचा निषेध नोंदवला. त्यामुळे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला प्रश्न विचारला आहे. 

सचिन तेंडुलकरने ३ फेब्रुवारीला देशाची अखंडता आणि सार्वभोमत्व याबद्दल ट्विट केलं होत. या नंतर सोशल मिडियावर सचिन विरोधी वातावरण झाल होत, अनेकांनी त्यांच्या ट्विटवर कमेंट्स केल्या होत्या. तर, केरमधील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या लाकडी कटआऊटला काळ्या आॅईलने अंघोळ घालून सचिनच्या ट्विचता निषेध नोंदवला होता. केरळमधील कोची येथे हा प्रकार घडला होता. त्यावर फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की,  ''केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का'' ? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. 

सचिने तेंडुलकरचं ट्वविट

शेतकरी आंदोलना संदर्भात रिहानाने ट्विट केल्यानंतर सचिन तेंडुलकर यांनी ट्विट केले होते. ''भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले अोळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंघ रहायला हवा'', अशे ट्विट सचिनने केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com