देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत ‘रक्षक बंधन’ला सुरुवात 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘रक्षक बंधन’ या उपक्रमाचा आज (ता. २७ ) माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
Devendra Fadnavis launches 'Rakshak Bandhan' in Mumbai
Devendra Fadnavis launches 'Rakshak Bandhan' in Mumbai

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘रक्षक बंधन’ या उपक्रमाचा आज (ता. २७ ) माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. 

या वेळी भाजपचे मुंबई विभागाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

‘रक्षक बंधन’ कार्यक्रमांतर्गत कोविड योद्धे डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलिस, मीडिया कर्मचारी आदींसाठी प्रत्येक घरांतून दोन दोन राख्या आणि कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रे जमा करून पोचविण्यात येतील. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक वॉर्डमध्ये भाजपतर्फे या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक पोलिस ठाणे, स्थानिक रुग्णालय, सफाई चौकी, माध्यमांचे कार्यालय अशा ठिकाणी हा रक्षक बंधन कार्यक्रम करण्यात येईल. त्याचबरोवबर सीमेवर तैनात जवानांसाठी जनतेच्या कृतज्ञेच्या भावना राखीच्या माध्यमातून पोचविण्यासाठी देखील याच ‘रक्षक बंधन’ राख्या जमा करण्यात येणार आहेत. 

आज जमा झालेल्या राख्यांची पहिली पेटी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सैनिकांसाठी लडाखला रवाना करण्यात आली आहे. जसजशा राख्या जमा होतील, तस तशा त्या लडाख येथे पाठवण्यात येणार आहेत. या राख्या जमा करण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये सोसायट्या तसेच सार्वजनिक ठिकाणी ‘रक्षक बंधन’च्या पेट्या भाजपतर्फे ठेवण्यात येणार आहेत. येत्या १ ऑगस्टपर्यंत नागरिकांनी कोविड योद्धे तसेच जवानांसाठी मोठ्या संख्येने प्रत्येक घरांतून दोन दोन राख्या या पेट्यांमध्ये जमा कराव्यात, असे आवाहनही मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.


हेही वाचा : पंतप्रधान होण्याइतकी उद्धव ठाकरे यांची ताकद नाही   

नवी मुंबई : पंतप्रधान होण्याइतकी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ताकद नाही. देशभरात त्यासाठी पक्षाचे खासदार असावे लागतात, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. 

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेत उलवे येथील डोंगरामधील वादग्रस्त लेण्यांना भेट देण्यास आठवले सोमवारी (ता. २७ जुलै) आले होते. त्या प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आठवले बोलत होते. 

या वेळी आठवले यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात आधी भीमशक्ती आणि शिवशक्तीचा नारा दिला होता. तो आजही आमच्या स्मरणात आहे, असे आठवले यांनी सांगितले. उद्वव ठाकरे यांनी भीमशक्ती शिवशक्तीचा प्रयोग केला होता. त्यातूनच राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आले होते.

Edited By Vijay Dudhale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com