devendra fadavnis criticizes udhhav thackrey government | Sarkarnama

उद्धव ठाकरेंचे सरकार पडेपर्यंत वाट पहायला तयार : फडणवीस

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 जुलै 2020

आमचं सरकार पाडून दाखवा' असं सांगितलं जात आहे. त्यांना 'अगोदर चालवून दाखवा' असं माझं आव्हान आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार आर्तंविरोधामुळे कोसळेल असा दावा करत तोपर्यंत आपण थांबायला तयार असल्याचे सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज झाली. या बैठकीत फडणवीस बोलत होते. सुरवातीलाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लगोलग त्यांनी जोरदार हल्लाबोलही केला. 

संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीकडे निर्देश करून फडणवीस म्हणाले, या मुलाखतीत राज्य सरकार हे 'तीनचाकी एटो रिक्षा आहे' , तसेच त्याचे स्टेअरिंग त्यांच्या हातात असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. मात्र उद्धव ठाकरे काही गोष्टी विसरले.  रिक्षा कुठे जाणार हे सवारी ठरवते, ज्याच्या हातात स्टेअरिंग आहे ते ठरवत नाहीत. या रिक्षातील सवारीचं काही समजत नाही, एकजण उत्तरेकडे जा म्हणतो दुसरा दक्षिणेकडे जा म्हणतो. ही रिक्षा कोण कुठे चालवतंय, हे समजायला मार्ग नाही. यात महाराष्ट्राचं नुकसान आहे. या सरकारचं अस्तित्वच कुठे दिसत नाही. मात्र 'आमचं सरकार पाडून दाखवा' असं सांगितलं जात आहे. त्यांना 'अगोदर चालवून दाखवा' असं माझं आव्हान आहे. स्वत: मारायचं आणि रडायचं असं चाललं आहे. सरकारच्या अपयशापासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे केले जात आहे. आम्हाला सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही. आम्ही कोविडची लढाई लढतोय. तुमचे सरकार इतके आर्तंविरोधाने भरलेले आहे की, ते आपोआप पडणार आहे. ते पाडण्याची आम्हाला आवश्यकता नाही. एकमेकांच्या तंगड्या तुम्हीच ओढत आहात. आर्तंविरोधाने ते पडेल, तोपर्यंत आम्ही वाट पहायला तयार आहोत. त्यानंतर महाराष्ट्राचं भवितव्य आम्ही ठरवून दाखवू, असेही फडणवीस म्हणाले 

"कुणी चंपा म्हणतं..तर कुणी कुत्रा म्हणतं...."
 
मुंबई : "कुणी चंपा म्हणतं..तर कुणी कुत्रा म्हणतं..अशी विधाने खपवून घेतली जाणार नाही.  भाजप नेत्यावर केलेल्या अशा विधानांना उत्तर देण्यासाठी भाजपला आक्रमक व्हावे लागेल," असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केले. महाराष्ट्र भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडे ही खंत व्यक्त केली. 

भारतीय जनता पक्षाने ता. ३ जुलै रोजी जाहीर केलेल्या नवीन कार्यकारीणीची पहिलीच बैठक जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाली.  

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख