होय, मी मिळवला सीडीआर...करा माझी चौकशी! फडणवीसांचे सरकारला आव्हान

मनसुख हिरेन यांचा खाडीत मृतदेह सापडल्याने त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर सरकारवर ताशेरे ओढले.
Devendra Fadanvis slams state government over mansukh hiren death
Devendra Fadanvis slams state government over mansukh hiren death

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभेत थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) कुठून मिळाला, अशी शंका उपस्थित करून पटोले यांनी चौकशीची मागणी केली. त्यावर संतापलेल्या फडणवीस यांनी होय, मी मिळवला सीडीआर, करा माझी चौकशी, असे आव्हान सरकारला दिले.

विधीमंडळाचे कामकाज सुरु झाल्यावर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांसह सापडलेली जीप ताब्यात असलेल्या मनसुख हिरेन यांचा खाडीत मृतदेह सापडल्याने त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर सरकारवर ताशेरे ओढले. तसेच सचिन वाझे यांना तातडीने अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यावर गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले. 

देशमुख म्हणाले, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडून केला जात आहे. विरोधी पक्षांकडे पुरावे असतील तर एटीएलला द्यावेत. कुणालाही पाठिशी घालणार नाही. एटीएसमध्ये सचिन वाझे नाहीत. त्यामुळे निपक्षपणे तपास केला जाईल, असे आश्वासन देशमुख यांनी दिले. 

पण त्यावर समाधान न झाल्याने फडणवीस यांनी गृहमंत्र्यांवरच जोरदार टीका केली. एखाद्या व्यक्तीला किती पाठिशी घालणार. हे सचिन वाझे आजही क्राईममध्ये प्रमुख आहेत. त्यांची चौकशी होऊ शकते. त्यांना आधी निलंबित केले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना पुरावे नष्ट करण्याची मुभा देता. हा तुमचा खरा चेहरा दिसतोय. इतके पुरावे आल्यानंतरही केवळ विशिष्ट पक्षामध्ये प्रवेश केला होता म्हणून वाचविण्याचा प्रयत्न केला जातोय. गृहमंत्री एखाद्या अपराध्याला पाठिशी घालणार असले तर योग्य नाही. हे चालू देणार नाही. अशी खरमरीत टीका फडणवीस यांनी केली.

फडणवीस यांच्या या पवित्र्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. या गोंधळात नाना पटोले बोलण्यास उठले. त्यांनी थेट फडणवीस यांच्याकडील सीडीआरचा मुद्या उपस्थित केला. विरोधकांना सीडीआर कसा मिळाला, त्यांना तो अधिकार आहे का? त्याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर फडणवीस चांगलेच भडकले. त्यांनी मी सीडीआर मिळवल्याचे सांगत चौकशी करण्याचे आव्हान दिले. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com