विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून सरकार घाबरलं अन् आनंदी फडणवीस! - Devendra fadanvis slams State government and shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून सरकार घाबरलं अन् आनंदी फडणवीस!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवीन अध्यक्षांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.

मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवीन अध्यक्षांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. याअनुषंगाने बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांच्या निवडीबाबत सुचक वक्तव्य केले आहे.  

फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना अध्यक्षपदाच्या निवडीवर भाष्य केले. ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षपदाची निवड एकमताने करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र, सध्याच्या सरकारची विरोधकांशी वागणूक कशी आहे? विरोधकांशी संवाद नाही. त्यांच्या अधिकारांचे हनन केले जाते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात मित्रपत्रांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

तसेच अध्यक्षपदाच्या निवडीवरून सरकार घाबरले आहे, याचा आनंद असल्याचे फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्या या भूमिकेमुळे भाजपकडून अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी उमेदवार दिला जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

नाना पटोले अमेरिकेच्या राष्ट्रपतींवरही बोलतील

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नाना पटोले यांनी राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनविणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, पटोले हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींविषयीही बोलू शकतात. ते कुणाबद्दलही काही बोलू शकतात. त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. काँग्रेस चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये या क्रमांकावरून लढाई सुरू आहे. 

सरकार कुणाला वाचवतंय?

भंडारा आगप्रकरणी अध्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यावरून फडणवीस यांनी सरकाला धारेवर धरले. याप्रकरणी सरकार असंवेदनशील आहे. सरकार कुणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. काहीतरी असा मुद्दा आहे त्याला सरकार घाबरत आहे. पण याप्रकरणी एफआयआर तातडीने दाखल करायला हवा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

शिवसेनेवर टीका

मुंबई महापालिकेचे बजेच नुकतेच सादर करण्यात आले. यावरून फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधाला. बजेटमध्ये कितीही मोठे आकडे असले तरी त्याचा लोकांना काही उपयोग होणार नाही. मुंबईतील खड्डे, साठणारे पाणी यावर पैसे खर्च व्हायला हवेत. भ्रष्टाचारासाठी बजेटमध्ये जास्त आकडे दाखविणे बंद केल्याशिवाय हे शक्य होणार नाही, असे ते म्हणाले.  

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख