अनलॉकच्या गोंधळावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले भाष्य... 

अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची संमती मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल.
 Ajit Pawar .jpg
Ajit Pawar .jpg

रायगड : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार  (Vijay Vadettiwar) यांनी अनलॉकसंबंधी गुरुवारी घोषणा केल्यानंतर झालेल्या गोंधळावरुन राज्य सरकारवर टीका होत आहे. वडेट्टीवार यांनी राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवल्याची घोषणा केली आणि एकच गोंधळ उडाला. मात्र, असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले. या सर्व गोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar commented on the confusion of unlock)

ते रायगडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की ''अनलॉकबाबत पूर्णपणे सुसंवाद आहे. कोरोना आला तेव्हापासून राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांसमोर येतात. त्यानंतर अनेकदा राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे भूमिका मांडत असतात. वडेट्टीवार यांनी एक शब्द राहून गेला होता त्यामुळे गैरसमज झाला, असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री सांगतील तो अंतिम निर्णय असतो, ''असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

वडेट्टीवारांचे स्पष्टीकरण 

राज्यातील काही जिल्ह्यांत अनलॅाकचा प्रस्ताव असून त्यास आपत्ती व्यवस्थापन बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. परंतु मुंबईहून नागपूरला येण्याच्या गडबडीत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना तत्त्वत: हा शब्द विसरून गेलो असे स्पष्टीकरण वडेट्टीवार यांनी गुरुवारी दिले होते.

अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची संमती मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार ते लागू होईल असे वडेट्टीवार यांनी आज सांगितले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, विरोधक म्हणून त्यांची भूमिका योग्य असून त्यांना ती मांडावीच लागते. श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. सरकार म्हणून जे काही करावे लागते ते आम्ही करत असतो.''  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com