मैत्रिणीसोबतचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकणाऱ्या अंशुमन मल्होत्रावर दुर्गप्रेमी संतापले - Demand for action against actor Anshuman Malhotra | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मैत्रिणीसोबतचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकणाऱ्या अंशुमन मल्होत्रावर दुर्गप्रेमी संतापले

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

पोलिस आणि वन विभागाने मल्होत्रावर कारवाई करावी

पाली :  वन विभागाने किल्ल्यावर पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. तरीही एका अभिनेत्याने आपला वाढदिवस सुधागड Sudhagad येथे साजरा केला. त्यानंतर त्याने आपल्या मैत्रिणीसोबतचे आक्षेपार्ह छायाचित्र त्याने समाजमाध्यमांवर टाकल्याने दुर्गप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला आहे. 

अभिनेता अंशुमन मल्होत्रा Anshuman Malhotraयाने कोरोनाचे निर्बंध तोडत सुधागड किल्ल्यावर वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार नुकताच घडला. त्याने किल्ल्यावर आपल्या मैत्रिणीसोबत आक्षेपार्ह स्थितीमधील छायाचित्र काढून सोशल मीडियावर अपलोड केले. या सर्व प्रकाराला दुर्गप्रेमींनी व बा रायगड संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. पोलिस आणि वन विभागाने मल्होत्रावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी अंशुमन मल्होत्रा त्याच्या मित्र-मैत्रिणींसोबत किल्ले सुधागडवर आला होता; पण तिथे त्याने गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. आपल्या मैत्रिणीसोबतचे आक्षेपार्ह छायाचित्र त्याने आपल्या इन्स्टाग्राम व युट्यूबवर अपलोड केले. त्यानंतर स्थानिकांनी याला आक्षेप घेतला आहे. ‘स्वराज्यासाठी ज्या किल्ल्यांवर आमच्या बापजाद्यांनी रक्त सांडले. स्वराज्य उभारण्यासाठी रक्ताचा अभिषेक घातला. तेथे जर अशा घटना घडत असतील तर संबंधित व्यक्तींवर कारवाई व्हावी,' अशी मागणी 'बा रायगड परिवार' संस्थेने तहसीलदार व पाली पोलिसांकडे केली आहे. या वादानंतर इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह छायाचित्र दिसत नसल्याने तो काढला असण्याची शक्यता आहे.

हे क्षेत्र अभयारण्य घोषित केले असल्याने वन विभागाने किल्ल्यावर पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. तरीही हे लोक किल्ल्यावर कसे आले? याबाबत योग्य ती कारवाई करावी, तसेच सर्वांनीच गडांचे पावित्र्य जपावे.
प्रदीप गोळे, दुर्गप्रेमी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख