शिवसेना शाखाप्रमुखाकडून डिलिव्हरी बॉयला मारहाण 

राहुल शर्मा हे शिवाजी मैदानाजवळ असलेल्या शिवसेना शाखेच्या शेडमध्ये उभे होते.
शिवसेना शाखाप्रमुखाकडून डिलिव्हरी बॉयला मारहाण 
Sarkarnama Banner - 2021-07-30T113755.664.jpg

मुंबई: ई-कॉमर्स साईटसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत करीत असलेल्या एका तरुणाला शिवसेना शाखाप्रमुखाने मारहाण केल्याची घटना नुकतीच मुंबईत घडली. याप्रकरणी शिवसेना शाखाप्रमुखासह चार जणांना अटक केली आहे. दोन जण फरार आहेत. कांदिवलीच्या पोईसर परिसरात हा प्रकार घडला. एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ शिवसेनेची पंतप्रधानांवर टीका
राहुल शर्मा (रा. जयहिंद चाळ, कांदिवली) यांनी (rahul sharma) याबाबत समता नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पाऊस असल्याने राहुल शर्मा हे शिवाजी मैदानाजवळ असलेल्या शिवसेना शाखेच्या शेडमध्ये उभे होते. त्यावेळी तेथून जाणारे शिवसेना शाखाप्रमुख shivsena shakhapramukhचंद्रकांत निनावे यांचा पाय शर्मा यांच्या सामानाला लागल्याने वाद निर्माण झाला. 

अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका
सामान आहे, जरा सांभाळून जा, असे शर्मा यांन निनावे यांना सांगितले. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन मारामारीत झाले. निनावे यांनी पाच जणांनी शर्माला मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : धक्कादायक : माजी व्यवस्थापकाकडून बँक लुटण्याचा प्रयत्न..  
वसई/ विरार : विरार येथील आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थपकानेच बँक लुटण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन दरोडेखोरांनी हा सशस्त्र दरोडा टाकून, सोने आणि पैशाची बॅग घेऊन  फरार होत असताना एका दरोडेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे..यावेळी त्याने केलेल्या चाकू हल्ल्यात बँकेच्या व्यवस्थापक महिलेचा मृत्यू झाला तर अन्य महिला जखमी झाली. हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. काल रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in