आज रडणारी दिपिका म्हणाली होती," एक दिवस राहुल पंतप्रधान होतील !'  - Deepika, who was crying today, had said, "One day Rahul will be the Prime Minister!" | Politics Marathi News - Sarkarnama

आज रडणारी दिपिका म्हणाली होती," एक दिवस राहुल पंतप्रधान होतील !' 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि राहुल गांधी हे विरोधीबाकावर आहेत.

पुणे : " कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे एक दिवस पंतप्रधान होतील, अशी मला आशा आहे. तसेच तरूणाईमध्ये ते खूपच लोकप्रिय आहेत. त्याचं आपलं असं एक राजकारण आहे अशी स्तुतीसूमने आघाडीची अभिनेत्री दिपिका पदुकोण हिने दहा वर्षापूर्वी उधळली होती. अर्थात त्यावेळी देशात कॉंग्रेसची सत्ता होती. 

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि राहुल गांधी हे विरोधीबाकावर आहेत. दिपिकाला जे राहुल यांच्याविषयी वाटले होते ते गेल्या सात वर्षात शक्‍य झाले नाही. 2014 मध्ये दणदणीत विजय संपादन करून मोदी पंतप्रधान बनले. त्यांच्या नावाची देशात लाट आली. पुढे 2019 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान बनले आणि ते ही बहुमत घेऊनच. आणखी पाच वर्षानी मोदीच येणार असा ठाम विश्वास भाजप कार्यकर्त्यांना वाटतो. कारण मोदींना ठक्कर देणारा एकही नेता आज तरी देशात नाही अशी नेहमीच चर्चा होत असते. 

राहुल गांधी हे मोदी यांचे कट्टर विरोधक आहेत. मोदींच्या राजकारणाचा पर्दाफाश करणारा आणि मोदींना चॅलेंज करणारा राहुल सोडून विरोधी पक्षात एकही नेता नाही हे ही खरे. राहुल गांधी केव्हा पंतप्रधान बनतील हे काळच ठरवेल. पण, राहुल गांधींचे आजही देशभर चाहते आहेत. नाही असे म्हणण्याचे कारणही नाही. दिपिकालाही दहा वर्षापूर्वी वाटत होते की ते पंतप्रधान होतील म्हणून ..! याबाबतचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दिपिकाचे नाव सध्या ड्रग्जप्रकरणी चर्चेत आले आहे. तिची एनसीबीने पाच तास चौकशी केली. या चौकशी दरम्यान अधिकाऱ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना तिला तीन वेळा रडू कोसळले. काही प्रश्‍नाना तिने उत्तरे दिली नाहीत. तसेच आपण कधीही ड्रजचे सेवन केले नाही असेही तिने म्हटले आहे. 

सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणानंतर बॉलिवूडबाबत काही प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. अभिनेत्री सुशांतसिंह याने ड्रग्ज सेवनामुळे आत्महत्या केली असेही बोलले जात आहे. तसेच बॉलिवूडमध्ये ड्रग्जचे रॅकेट असल्याची माहिती पुढे आली आणि व्हिडिओही आले. या आधारे दिपिका, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची एनसीबी चौकशी करीत आहे. मात्र या दोघींपेक्षा दिपिकावरच अधिक चर्चा होताना दिसत आहे. 

दिपिकाने राहुल गांधींचे केलेले कौतुक काहींना रूचले नाही. दहा वर्षापूर्वी जरी तिने राहुल पंतप्रधान होतील असे म्हटले असले तरी गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात ती जेएनयूमध्ये गेली होती. काही बोलली नव्हती. यालाही महत्त्व आहे. तिने राहुल गांधीविषयी केलेले विधान असेल किंवा जेएनयूत जाणे असेल त्याचा सध्याच्या चौकशीशी संबंध नाही. मात्र सोशल मीडियाने या दोन गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. 

काय म्हणाली होती दिपिका ! 
हो,अर्थात ! एक दिवस राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होती. देशातील तरूणाईशी त्यांचे कनेक्‍टस्‌ उत्तम आहेत. त्यांचे विचार आणि त्यांच दिसणं ट्रडिशनल आहे. भविष्याचा दृषिकोणही आहे. मला वाटते हेच देशाच्या दृष्टिने महत्त्वाचे आहे असे 2010 मध्ये दिपिका पदुकोणने एका हिंदी चॅनेलला मुलाखत देताना म्हटले होते. तिच्यावर आता कारवाई सुरू असताना आणि ती रडत असताना नेमका हा व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. तो का व्हायरल होत आहे याचा अर्थ ज्याने त्याने काढावा. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख