मराठा समाजासाठी निर्णय होतात,आमच्यासाठी का नाही ? प्रकाश शेंडगेंचा सवाल 

जर आमच्याबाबत सरकारने निर्णय घेतला नाहीत तर आम्ही आता रस्त्यावर उतरणार आहोत.
मराठा समाजासाठी निर्णय होतात,आमच्यासाठी का नाही ? प्रकाश शेंडगेंचा सवाल 

मुंबई : मराठा समाजासाठी निर्णय होतात, आमच्यासाठी नाही असे सांगत येत्या 10 नोव्हेबरला मुंबईत ओबीसी नेत्यांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती ओबीसी नेते आणि आमदार प्रकाश शेंडगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 धनगर समाजाच्या मागण्यांची दखल घेतली नाहीत पुढील रणनिती ठरविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. 

मुंबईत होणारी गोलमेज परिषद सकाळी 10 ते संध्या. 5 पर्यंत होणार आहे असे स्पष्ट करून शेंडगे म्हणाले, की या परिषदेसाठी सगळे नेते एकत्र येऊन काम करतील. गोलमेज परिषदेला मोठी घोषणा करण्यात येणार आहे. ओबीसी पहिल्यांचा एकवटला, त्यांची ताकद उभ्या देशाने पाहिली आहे. 

जर आमच्याबाबत सरकारने निर्णय घेतला नाहीत तर आम्ही आता रस्त्यावर उतरणार आहोत. मराठा समाजासाठी निर्णय होतात, आमच्यासाठी का होत नाही? 

मराठा समाजाचे नेते बाळासाहेब सराटे यांनी जी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे, ती मागे घ्यावी अशी मागणीही शेंडगे यांनी केली आहे. काही मराठा समाजाचे नेते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचं सांगतात, ही बाब बेकायदेशीर आहे. ओबीसी समाजाचं आरक्षण खेचण्याचं काम मराठा समाज करत आहे. येत्या काळात कोर्टात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष अटळ असल्याचेही शेंडगे म्हणाले. 

हे ही वाचा :  
उद्धव ठाकरेंनी वडीलांप्रमाणे हिंमत दाखविली ! 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे हिम्मत दाखविली आहे. रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली. कारवाई केलीत हे पाहून मला समाधान वाटलं असे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांनी म्हटले आहे. 

राम गोपाळ वर्मा यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की अर्णब गोस्वामीवरील कारवाई पाहून मला समाधान वाटले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांसारखी हिंमत दाखविली आहे. एका किंचाळणाऱ्या बोक्‍याला थेट पिंजऱ्यात टाकल आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in