क्राईम ब्रांचचा अधिकारी भासवून तरुणाला लाखोचा गंडा; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात - Deceived the young man by claiming to be an officer of the Crime Branch | Politics Marathi News - Sarkarnama

क्राईम ब्रांचचा अधिकारी भासवून तरुणाला लाखोचा गंडा; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 मे 2021

पाच लाख रुपयाची खंडणी उकळल्यानंतर त्याच्याकडे आणखी १० लाख रुपयाची खंडणी त्याने मागितली होती. 

डोंबिवली : क्राईम ब्रांचचा (Crime Branch) अधिकारी असल्याचे भासवून एका तरुणाकडून लाखोची खंडणी उकळणाऱ्या तुषार शीलवंत या तरुणाला मानपाडा पोलिसांनी (Police) कल्याणात सापळा रचून अटक केली. पाच लाख रुपयाची खंडणी उकळल्यानंतर त्याच्याकडे आणखी १० लाख रुपयाची खंडणी त्याने मागितल्या नंतर याप्रकरणी तरुणाने मानपाडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. गुरुवारी सकाळी खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या तुषारला दुर्गाडी किल्ल्याजवळ पोलिसांनी सापळा रचून अटक केल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली. (Deceived the young man by claiming to be an officer of the Crime Branch)

हे ही वाचा : मोठा निर्णय; मराठा आरक्षणप्रकरणी केंद्राची फेरयाचिका

डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात राहणाऱ्या शंकर परब या तरुणाचे सागर्ली जिमखाना रोड येथील एका बिल्डींग मध्ये ऑफिस आहे. ७ एप्रिल रोजी या ऑफिसमध्ये चार चाकी गाडीने आलेल्या तुषार नावाच्या एका व्यक्तीने आपण वाशी येथील क्राईम ब्रांचमध्ये पोलिस असून आपल्याकडे जानवी नावाच्या तरुणीची तक्रार आल्याचे सांगितले तसेच या तक्रारीवरून शंकर विरोधात कोणतीही कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयाची मागणी केली. 

त्यातील दोन लाख त्याचवेळी घेतले तर दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन आणि तिसऱ्या दिवशी ९ एप्रिल रोजी १ लाख रुपये घेतले. एवढ्यावरच न थांबता त्याने १ मे पासून १२ मे पर्यत शंकरला पुन्हा पुन्हा व्हाटस अप कॉल करून आणखी १० लाख रुपयाची मागणी केली. यामुळे त्रासलेल्या शंकर यांनी १२ मे रोजी संबधित इस्मा विरोधात मानपाडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. १३ मे रोजी सकाळी हि खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी तुषार याने शंकरला दुर्गाडी किल्ल्याजवळ बोलावले होते.

हे ही वाचा : कोरोना लसीसाठी राजेश टोप यांनी मोदींना सुचविला हा फॅार्म्यूला

हि खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या तुषारला मानपाडा पोलिसांनी सापळा रचून  रंगेहाथ ताब्यात घेत अटक केली, असल्याचे डोंबिवलीचे एसीपी जय मोरे यांनी सांगितले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख