शिवसेनेचा पदाधिकारी गोत्यात; सुनेची छळाची तक्रार अन् भाजपचा अब्रुनुकसानीचा दावा

जो व्हिडिओ आहे तो दोन वर्षापूर्वीचा आहे. पोलिसांनी आमच्यातील वाद मिटवला होता.
 daughter in law complaint against Shiv Sena Leader .jpg
daughter in law complaint against Shiv Sena Leader .jpg

डोंबिवली : घरगुती वाद विकोपाला गेल्यामुळे सासरा सूनेच्या तोंडावर थुंकल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये समोर आली आहे. संबंधित व्यक्ती ही शिवसेनेची (Shiv Sena) पदाधिकारी असून त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या आधारे सूनेने आपल्या सासऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. (daughter in law complaint against Shiv Sena Leader)

त्यामुळे शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक प्रमुख एकनाथ पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की ''हे सर्व खोटे आरोप आहेत. मी 55 वर्षापासून राजकारणात आहे. माझ्यावर कोणीही असा आरोप केला नाही. जो व्हिडिओ आहे तो दोन वर्षापूर्वीचा आहे. पोलिसांनी आमच्यातील वाद मिटवला होता. भाजपच्या (Bjp) संदीप माळी यांनी राजकीय फायद्यासाठी सूनेला हाताशी धरुन माझी बदनामी सुरु केली आहे. संदीप माळी यांच्या सांगण्यावरुन हे केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

शनिवारी संध्याकाळी डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण (MLA Ravindra Chavan) यांच्यासोबत माजी भाजप नगरसेविका रविना माळी आणि भोपर गावातील हर्षला पाटील यांनी कल्याणचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेत तक्रार दाखल केली. भेटीदरम्यान हर्षला पाटील यांनी त्यांचे सासरे एकनाथ पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की ''गेल्या काही वर्षापासून एकनाथ पाटील हे मला व माझ्या पतीला आणि मुलींना मानसिक त्रस देतात आणि मारहाण करतात. एकेदिवशी ते तोंडावर थुंकले'' असेही सांगितले. तर पुरावा म्हणून हर्षला यांनी पोलिसांना या घटनेची व्हिडीओ क्लीप सादर केली आहे. हर्षदा पाटील यांनी सादर केलेल्या व्हिडिओची सतत्या पाहूनच कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. 

याबाबत भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी सांगितले की ''पाटील यांच्या घरगुती वादाशी माझा काही संबंध नाही, माझ्यावर चुकीचे आरोप केल्यास त्यांना न्यायालयात खेचणार, असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे या घरघुती भांडणातून भोपर गावात पुन्हा एकदा सेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com