विनातिकीट लोकलमध्ये चढणाऱ्या दरेकरांना बसला 260 रुपयांचा भुर्दंड

प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात तर कांदिवलीमध्ये भाजप आमदार अतुल भातखळकरांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.
 Praveen Darekar fined for traveling by Mumbai local without a ticket .jpg
Praveen Darekar fined for traveling by Mumbai local without a ticket .jpg

मुंबई : मुंबई लोकल (Mumbai Local) सर्व सामान्यांसाठी सुरू व्हावी या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज (ता. ६ ऑगस्ट) मुंबईत भाजप नेत्यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी रेल्वेस्थानकांवर आंदोलन करण्यात येत आहे. चर्चगेट स्टेशन बाहेर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्या नेतृत्वात तर कांदिवलीमध्ये भाजप आमदार अतुल भातखळकरांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. दरेकर यांनी लोकलने चर्नीरोडपर्यंत प्रवास केला. मात्र, त्यांनी तिकिट न घेतल्यामुळे २६० रुपये दंड भरावा लागला. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही दंड भरावा लागला.  (Praveen Darekar fined for traveling by Mumbai local without a ticket) 

मुंबईच्या लोकलमध्ये सामान्य नागरिकांना प्रवास करण्याची मुभा मिळावी आणि लोकल प्रवासाला परवानगी न देण्याच्या विरोधात मुंबई भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. हे सरकार निर्णय का देत नाही, असा सवाल आंदोलकांनी केला आहे. ज्यांचे लसीचे दोन्ही डोस झाले आहेत त्यांना प्रवास का नाही, असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे. यावेळी अतुल भातकळकर यांनी कार्यकर्त्यांसह कांदिवली स्टेशन बाहेर ट्रेन भरो अंदोलन केले आहे. राहुल नारवेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

 
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चर्नीरोडपर्यंत प्रवास केला. प्रवाशांनी रेल्वे प्रवास करावा, सरकारने आता कुठलाही विलंब न करता, लोकल सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकरने आंदोलन दडपणयाचा प्रयत्न केला, असा आरोपही दरेकर यांनी केला. यावेळी दरेकर यांच्या सोबत अनेक भाजप कार्याकर्त्यांनी लोकलने प्रवास केला. मात्र, कार्यकर्त्यांनी विना तिकिट प्रवास केल्यामुळे त्यांच्यावर टिसीकंडून कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, ही आमची जुनी मागणी आहे. आता न्यायालयाने याबाबत सरकारला सांगितले आहे. आम्ही विचारतो, ते राजकारण वाटत असेल, परंतु न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का?'' असा सवाल दरेकर यांनी केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com