दलित यूथ पॅंथरच्या प्रदेशाध्यक्षास पाच लाखांच्या खंडणीप्रकरणी अटक  - Dalit Youth Panther state president arrested for Rs 5 lakh ransom | Politics Marathi News - Sarkarnama

दलित यूथ पॅंथरच्या प्रदेशाध्यक्षास पाच लाखांच्या खंडणीप्रकरणी अटक 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

अटक करण्यात आलेल्यांमध्ये जाधव याच्यासह त्याच्या खासगी सचिवाचाही समावेश आहे. 

मुंबई : पाच लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी दलित यूथ पॅंथरचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाईसाहेब जाधव याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जाधव याच्यासह त्याच्या खासगी सचिवाचाही समावेश आहे. 

भाईसाहेब जाधव, अनिकेत घाडगे, हृतिक कांबळे, नामदेव पाटील आणि कमलेश शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांना या प्रकरणी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामधील भाईसाहेब जाधव हा दलित यूथ पॅंथरचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे; तर अनिकेत घाडगे हा त्याचा खासगी सचिव आहे. 

संशयित आरोपींनी नीरज सिमेंट कंपनीमध्ये काम करणाऱ्या तक्रारदाराच्या कार्यालयात जाऊन सामाजिक कार्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच, पैसे न दिल्यास ज्या ठिकाणी काम सुरू आहे. त्या ठिकाणी अडचण निर्माण करू, असेही सांगितले होते. 

या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनुसार दोन आरोपींसह तीन अनोळखी व्यक्तींवर आयपीसी कलम 384, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर इतरही संशयितांचा सहभागही तपासात निष्पन्न झाल्यानंतर इतर तिघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख