मनसुख हिरेन प्रकरणातील दोघांचा NIA कोठडीतील मुक्काम वाढला - custody of two accused increased in the case of finding explosives near antilia | Politics Marathi News - Sarkarnama

मनसुख हिरेन प्रकरणातील दोघांचा NIA कोठडीतील मुक्काम वाढला

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 जून 2021

मनसुख हिरेन यांची गाडी सापडल्यानंतर शेलार व जाधव हे दोन्ही बेपत्ता होते

मुंबई : उद्योगपती मुकेस अंबानी यांच्या एंटीलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करीत आहे. याप्रकरणी अटकेत असलेले आरोप संतोष शेलार, आनंद जाधव यांची एनआयए कोठडी १ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी सुनील माने हा न्यायालयीन कोठडीत आहे. custody of two accused increased in the case of finding explosives near antilia 

माने याला एप्रिलमध्ये अटक करण्यात आली होती तर शेलार व जाधव यांना ११ जून रोजी अटक करण्यात आली आहे. त्या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची पुन्हा चैाकशी करण्यासाठी एनआयएने कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यांची ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. काल शेलार आणि जाधव यांना न्यायमूर्ती पी.आर. सितरे यांच्यासमोर हजर करण्यात आले होते.

मनसुख हिरेन यांची गाडी सापडल्यानंतर शेलार व जाधव हे दोन्ही बेपत्ता होते. ते दोन्ही दिल्ली व अन्य ठिकाणी देखील गेले होते. त्यांना लातूर येथून अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही सोशल मीडियाच्या माध्यमांतून काही जणांच्या संपर्कात होते, त्यांना पैसा कोण पुरवत होते, याचा तपास करायचा असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितलं.  याप्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

हेमंत करकरे यांना देशभक्त मानत नाही..भाजप खासदारांचे वादग्रस्त विधान

भोपाळ : भाजपच्या भोपाळ येथील खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर  pragya thakur पुन्हा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे. मालेगाव बॅाम्बस्फोट प्रकरणाविषयी बोलत असताना त्यांनी तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्याविषयी व्यक्तव्य केलं. यापूर्वीही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी असे विधान केल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मुंबई दहशतवादी हल्ल्यात (Mumbai Terror Attack) शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे  यांच्याबाबत प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. 

 Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख