शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करताय मग सरसंघचालक काय करतायंत ?  - Criticizing Shiv Sena's Dussehra rally, then what is Sarsanghchalak doing? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करताय मग सरसंघचालक काय करतायंत ? 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

आज होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यावर विरोधीपक्षाने टीका केली आहे. या टीकेचा समाचार संजय राऊत यांनी घेतला आहे.

मुंबई : विरोधीपक्ष आम्हांला बोलतो आहे की दसरा मेळावा का घेताय म्हणून, जणांची नाही तरी मनाची वाटते की नाही.आम्ही त्यांना बोलतो तुमचे सरसंघचालक काय करत आहेत. त्यांना जणांची ना मनाची काही वाटत नाही का ? असा संतप्त सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क मैदानात होणारा शिवसेनेचा भव्यदिव्य "दसरा मेळावा" यावर्षी मात्र कोरोना महामारीमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, मुंबई येथे आज संध्याकाळी होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून मेळावा होईल. 

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहपरिवार शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना देतील आणि मग ठस्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात भाषण सुरू करून जनतेला संबोधित करतील, ठाकरे यांच्या भाषणाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

आज होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यावर विरोधीपक्षाने टीका केली आहे. या टीकेचा समाचार संजय राऊत यांनी घेतला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुखपट्टी काढून आज सर्व विषयांवर आपली भूमिका स्पष्ट करतील. मी मागिल दसरा मेळाव्याला बोललो होतो. आमचा मुख्यमंत्री होणार आणि मुख्यमंत्री झालाचं. 

विरोधीपक्ष आम्हांला बोलतो आहे की दसरा मेळावा का घेताय म्हणून, जणांची नाही तरी मनाची वाटते की नाही.आम्ही त्यांना बोलतो तुमचे सरसंघचालक काय करत आहेत. त्यांना जणांची ना मनाची काही वाटत नाही का ? असा सवालही राऊत यांनी यावेळी केला आहे. 

दरम्यान,कोरोना झाल्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी यंत्रनेवर विश्वास दाखवत रूग्नालययात दाखल झाले मी प्रार्थना करतो की ते लवकर बरे होवोत ! असेही राऊत यांनी शेवटी सांगितले. 

हे ही वाचा : 

कोरोना सदृश्य लक्षणे, प्रितम मुंडे दसरा मेळाव्याला गैरहजर...

बीड : कोरोनासदृष्य लक्षणांमुळे सावरगाव घाट (ता. पाटोदा) या संत भगवानबाबांच्या जन्मस्थळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचे खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी कळवले आहे. त्यांच्या फेसबुक पेजवरुन ही माहिती देण्यात आली आहे. लक्षणे दिसताच त्यांनी तपासणी करून घेैतली असून अहवालाची प्रतिक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथे काही वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने दसरा मेळावा होतो. या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी भगवानभक्तीगडाची स्थापनाही केली आहे. दरम्यान, यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मेळावा होणार नसला तरी पंकजा मुंडे या ठिकाणी निवडक समर्थकांसह दर्शनाला पोचल्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख