Covishield: लसीच्या दोन डोसमधील अंतर कुणाच्या सल्ल्यावरून दुप्पट?.. - coronavirus covid 19 covishield vaccine corona vaccination ntagi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

Covishield: लसीच्या दोन डोसमधील अंतर कुणाच्या सल्ल्यावरून दुप्पट?..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 जून 2021

दोन लसींमधील अंतर वाढवून जवळपास दुप्पट करण्यास वैज्ञानिकांचा पाठिंबाच नव्हता.

नवी दिल्ली : कोविशिल्डच्या दोन लसींमधील अंतर वाढवून जवळपास दुप्पट करण्यास वैज्ञानिकांचा पाठिंबाच नव्हता. तज्ज्ञ गटातील 3 सदस्यांनी हा खुलासा केल्याचे समजते. रॉयटर्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. coronavirus covid 19 covishield vaccine corona vaccination ntagi

कोरोना व्हायरस (Coronavirus)ला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कोविशिल्ड (Covishield) लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढण्याबाबतचा निर्णय जाहीर केला.  गेल्या महिन्यात १३ मे रोजी केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर12 ते 16 आठवडे इतकं निश्चित करण्यात आले. अगोदर हे अंतर 6 ते 8 आठवडे होते. हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटानं केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचं देखील सांगितलं गेलं. पण आता त्याच वैज्ञानिकांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या लशीच्या अंतराबाबर घेतलेल्या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) या गटाने या लशींच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याच्या दिलेल्या सल्ल्यावरून हा निर्णय घेतल्याचं देखील जाहीर करण्यात आलं. या गटाने अंतर दुप्पट करण्याला कधीही समर्थन दिलं नव्हतं, असे स्पष्टीकरण यापैकी काही तज्ज्ञांनी केले आहे.

“नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजी (NTAGI) च्या वैज्ञानिकांनी ८ ते १२ आठवड्यांपर्यंत अंतर वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील याचा सल्ला दिला आहे. पण १२ ते १६ आठवडे हे केंद्र सरकारचे आकडे आहेत. दोन डोसमधलं अंतर १२ आठवड्यांपेक्षा जास्त झालं तर १२ आठवड्यांनंतर कोणते संभाव्य परिणाम होऊ शकतात, याचा कोणताही डाटा NTAGI कडे नाही”, असे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते रॉयटर्सशी बोलताना सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख