कोरोनाचे नियम फक्त मनसेलाच का? शालिनी ठाकरेंचा विरोधकांना खडा सवाल  - Is Corona's rule only for MNS? Shalini Thackeray's tough question to the opposition  | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाचे नियम फक्त मनसेलाच का? शालिनी ठाकरेंचा विरोधकांना खडा सवाल 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 मार्च 2021

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने काही ठिकाणी पुन्हा लॅाकडाऊन करण्याची घोषणा केली.

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने काही ठिकाणी पुन्हा लॅाकडाऊन करण्याची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृंष्णकुंज येथे गोरेगांव पश्चिम विधानसभेमधील शिवसेना, भाजप आणि इतर संघटनेच्या अनेक कार्यकत्यांनी मनसेत प्रवेश केला. त्यावेळी कोरोनाचे कोणतेही नियम पाळले गेले नाही. तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, त्यावरुन मनसेवर टीका होत आहे.

फातिमाची झाली गीता अन् निघाली नायगावची राधा वाघमारे...
 

मनसेकडून अगामी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधनी केली जात आहे. त्यामुळे विविध पक्षातील कार्यकत्यांची मनसेत मेगा भरती सुरु आहे. आज गुरुवारी (ता. ११ मार्च) मुंबईतील गोरेगाव येथील 300 ते 400 कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. कोरोनामुळे राज ठाकरेंनी सर्वांची भेट घेतली नाही. मोजक्याच पदाधिकारी आणि महिलांची भेट घेतली. 

ममतांवर सायंकाळी ५ नंतर हल्ला होईल, भाजप खासदाराने आधीच केली होती भविष्यवाणी
 

मनसेवर झालेल्या टीकेला महिला अध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, 'गेले काही महिने अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मनसेत प्रवेश करतायेत. कोरोना संकटकाळात लोक अडचणी घेऊन कृष्णकुंजवरच यायचे. गोरेगांव पश्चिम विधानसभेमधील शिवसेना, भाजप आणि इतर संघटनांचे कार्यकर्ते आज मनसेत प्रवेश करत आहेत. इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांद्वारे आंदोलने केली, तेव्हा किती गर्दी झाली होती. तेव्हाही कोरोनाची भीती होतीच.

कोरोना काळात मंत्र्यानी विधान भवनात आंदोलन केली, त्यांनी नियम पाळले का? मग गर्दीचे नियम आम्हालाच का? असा सवाल मनसेचे गोरेगाव विभाग प्रमुख वीरेंद्र जाधव यांनी केला.  

दरम्यान, राज्यात कोरोनाचे संकट वाढत असल्याने काही ठिकाणी नाईलाजाने काही भागांमध्ये पुन्हा लाॅकडाऊन करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. लोक कोरोनाविषयक नियम पाळत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना आज सांगितले.
 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख