ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णाचा रुग्णाल्याच्या दारातच मृत्यू

रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्यामुळे त्यांना दाखल केले नाही.
 Corona patient dies due to lack of oxygen .jpg
Corona patient dies due to lack of oxygen .jpg

मुंबई : कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अनेक रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मुंबईमध्ये ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या बांद्रा भाभा रुग्णालायाच्या दारात दिपक म्हात्रे (वय ५७) या कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्यामुळे त्यांना दाखल केले नाही. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत रेल्वेद्वारे अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या ऑक्सिजन एक्सप्रेसला परिवहन मंत्री अनिल परब यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.

राज्याला विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी 7 मोठे टँकर घेऊन जाणारी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’रवाना करण्यात आली. रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे केली होती. त्याला रेल्वेने प्रतिसाद देताच राज्याने जलदगतीने हालचाली करुन पहिली रेल्वे रवाना केली.

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांबरोबरच मृतांची संख्याही वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीबरोबर मृत्यूचा आकडा वाढत आहे. ताज्या आकडेवारीमध्ये त्यात भर पडली आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णवाढ कमी झाली आहे. मात्र, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या कमालीची वाढली आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात दीड हजारांहून अधिक कोरोनाबळीची नोंद झाली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com