आता ग्रीन फंगसचा धोका; देशात पहिला रुग्ण सापडला 

रुग्णाला म्युकरमायकोसिसचा (काळी बुरशी) संसर्ग झाल्याची भीती असल्याने रुग्णाने चाचणी केली असताना ही माहिती समोर आली.
  Corona, Green Fungus .jpg
Corona, Green Fungus .jpg

मुंबई :  ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून (Covid19) बरे झालेल्या रुग्णांना (Patient) होत आहे. काळ्या बुरशीनंत आता हिरव्या बुरशीची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील  कोरोनावर मात केलेल्या एका ३४ वर्षीय रुग्णाला हा संसर्ग झाला आहे.  या रुग्णाला उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. (Corona-free patient infected with green fungus) 

रुग्णाला म्युकरमायकोसिसचा (काळी बुरशी) संसर्ग झाल्याची भीती असल्याने रुग्णाने चाचणी केली असताना ही माहिती समोर आली. श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (SAIMS) छातीच्या आजार विभागाचे प्रमुख डॉक्टर रवी दोशी यांनी सांगितले की हा रुग्ण कोरोनामधून बरा झाला होता. मात्र, त्याला आपल्याला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याच संशय आला. यामुळे त्याने चाचणी केली असता त्याला फुफ्फुस आणि रक्तात हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.

कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये असणारा हिरवी बुरशी संसर्गाचा प्रकार इतर रुग्णांच्या तुलनेत वेगळा आहे का यावर संशोधनाची गरज असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. या रुग्णाला दोन महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसात १०० टक्के कोरोना संसर्ग झाला असल्याने जवळपास एक महिना त्यांना आयसीयूत ठेवले होते. 

कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांच्या नाकातून रक्त वाहत होते तसंच खूप ताप येत होता. वजन कमी झाल्याने त्यांना अशक्तपणाही आला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली. हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याची देशातील ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. रुग्णाला सध्या मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com