Corona to Education Minister Varsha Gaikwad: Infection of four ministers in five days
Corona to Education Minister Varsha Gaikwad: Infection of four ministers in five days

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना : पाच दिवसांत चार मंत्र्यांना लागण 

ठाकरे सरकारमधील चार मंत्र्यांना गेल्या पाच दिवसांत कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा कोरोना चाचणीचा अहवाल आज (ता. 22 सप्टेंबर) पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती गायकवाड यांनी स्वतः ट्‌विट करून दिली. दरम्यान, ठाकरे सरकारमधील चार मंत्र्यांना गेल्या पाच दिवसांत कोरोना विषाणूची लागण झाली आहे. 

शिक्षण मंत्री गायकवाड यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, आज तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोनाची चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा आणि काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोल्हापूरचे नेते हसन मुश्रीफ आणि कॉंग्रेस नेते, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत या दोन मंत्र्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल 18 सप्टेंबर रोजी या एकाच दिवशी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 19 सप्टेंबर रोजी कोरोना विषाणूची लागण झाली.

सध्या हे तीनही मंत्री रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यानंतर आज पुन्हा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. 

राज्याच्या मंत्रिमंडळातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनाही यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. हे सर्व मंत्री सध्या राज्याच्या मंत्रिमडळात काम करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com