चंद्रकांतदादा ही भाजपची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?

डॉ अनुप मरार व इतर संघाशी संबंधित या संस्थेचे विश्वस्त नागपुरात मराठा आरक्षणाविरोधात मोर्चे काढत होते तेव्हा भाजप गप्प का होती?
 Chandrakant Patil .jpg
Chandrakant Patil .jpg

मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाकडून (BJP) राज्य सरकारची कोंडी केली जात असल्याचे दिसत आहे. आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचा दावा करत आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष हे केंद्राच्या अधिकारात असल्याचे सांगत आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी काही कागदपत्रे ट्विट करत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना सवाल केला आहे. (Congress spokesperson Sachin Sawant criticizes Chandrakant Patil)

सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की ''मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या सेव्ह मेरीट सेव्ह नेशन संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? महाराष्ट्र भाजपने उत्तर द्यावे. चंद्रकांत पाटीलजी ही भाजप ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?'' असा सवाल सावंत यांनी केला आहे. 

''डॉ अनुप मरार व इतर संघाशी संबंधित या संस्थेचे विश्वस्त नागपुरात मराठा आरक्षणाविरोधात मोर्चे काढत होते तेव्हा भाजप गप्प का होती? न्यायालयात हे लोक मराठा आरक्षणाला विरोध करत होते तेव्हा, भाजप गप्प का होती? हे मूक समर्थन होते का? मागून पाठिंबा दिला का? महाराष्ट्र भाजप यांचे उत्तर द्या'', असे सावंत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालाय रद्द केला. त्यानंतर राज्यात वादाची ठिणगी पडली. राज्य सरकारने नीट बाजू मांडली नसल्याचा दावा भाजप करत आहे. तर आरक्षण रद्द व्हावे म्हणून भाजपकडून प्रयत्न केले गेले, असा आरोप इतर पक्षांकडून करण्यात येत आहे. सावंत यांनी Save Merit Save Nation संघटना भाजप आणि संघाशी संबंधित असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com