विमानतळावर झालेलं दांडीया नृत्य बरंच काही सांगून जातं!

महाराष्ट्राने कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही.
 Narendra Modi, Sachin Sawant .jpg
Narendra Modi, Sachin Sawant .jpg

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा मिळाल्यानंतर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने आपले मुख्य कार्यालय मुंबईऐवजी गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. १३ जुलैला अदानी ग्रुपने जीव्हीके ग्रुपकडून व्यवस्थापनाचा ताबा घेतला. त्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. (Congress spokesperson Sachin Sawant criticizes the central government) 

या संदर्भात सचिन सावंत यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की ''मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेलं दांडिया नृत्य बरंच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्र असेच गुजरातला नेले.'' असा टोला सचिन सावंत यांनी लागावला आहे.  

 
''महाराष्ट्राने कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही. अनेक उद्योजक महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचे झाले. मुंबई विमानतळ आधी GVK या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडे होते. GVK ने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही.'' असा निशाणा सावंत यांनी साधला आहे.

अदानी समूहाकडे गुवाहटी, लखनौ, अहमदाबाद, मंगळुरु, जयपूर व तिरुवंतपुरम येथील विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा आहे. जयपूर, तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षरी केली होती. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com