पीएम केअरकडून मिळालेले व्हेंटिलेटर फडणवीस, पाटलांनी सुरु करुन दाखवावेत! 

भाजपकडून नाहक बदनामी केली जात आहे. तकलादू व्हेंटिलेटर देऊन मोदी सरकारने जनतेच्या पैशाचा अपव्यय व जनतेच्या जीवाशी खेळ केला आहे.
 Chandrakant Patil, Devendra Fadnavis, Sachin Sawant .jpg
Chandrakant Patil, Devendra Fadnavis, Sachin Sawant .jpg

मुंबई : पीएम केअर फंडातून दिलेले व्हेटिंलेटर्स तकलादू असून त्यासंदर्भात सुरु असलेली सारवासारवही उघड झाली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे खोटे उघड पाडणाऱ्या औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या १७ मेच्या वस्तूस्थितीदर्शक अहवालाने केंद्र सरकार तसेच गुजरात भाजप नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडला, असल्याचे काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी म्हटले आहे. (Congress spokesperson Sachin Sawant criticizes BJP)

सचिन सावंत यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. ते म्हणाले की ''औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या उत्तराने केंद्र सरकारच्या कांगाव्याची पोलखोल झाली आहे. जनतेच्या जीवापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा महत्वाची वाटणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हे व्हेंटिलेटर सुरू करुन दाखवावे, असे आव्हान सचिन सावंत यांनी दिले आहे.

औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णतः तकलादू असल्याचे सांगितले होते. त्या अहवालाच्या आधारे काँग्रेसने केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून राज्याला दिलेल्या सर्व व्हेंटिलेटरची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. 

राष्ट्रीय स्तरावर वादळ उठल्यानंतर १४ मेला केंद्र सरकारने उत्तर देऊन ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा व सगळा दोष औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रूग्णालयावर टाकण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारच्या दाव्याची पोलखोल औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाने केंद्र सरकारला प्रत्युत्तर देऊन केली आहे व जनतेच्या पैशाचा अपव्यय झाल्याचे उघड केले आहे, असे सावंत म्हणाले. 

खाजगी रुग्णालयांना उसनवारीने व्हेंटिलेटर दिले व व्हेंटिलेटरसाठी रुग्णांकडून शुल्क घेऊ नये ही अट टाकली त्यात चूक काय? खाजगी रुग्णालयेही ती वापरत नाहीत. भाजपकडून नाहक बदनामी केली जात आहे. तकलादू व्हेंटिलेटर देऊन मोदी सरकारने जनतेच्या पैशाचा अपव्यय व जनतेच्या जीवाशी खेळ केला आहे. म्हणून या केंद्र सरकारच्या १४ मेला केलेल्या कांगाव्याला उत्तर देणाऱ्या या अहवालाने केंद्राचा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे हे स्पष्ट झाले. तसेच आमची केंद्र व राज्य सरकारने एकत्रित लेखापरीक्षण करावे ही व राज्य सरकारकडे केलेली चौकशीची मागणी पूर्णपणे योग्य आहे हे सिद्ध झाले, असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com