तुम्ही लढायचा आणि जिंकायचा! मला खात्री होती यावेळीही तुम्ही जिंकाल! - Congress MP Rajiv Satav dies in Pune due to corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

तुम्ही लढायचा आणि जिंकायचा! मला खात्री होती यावेळीही तुम्ही जिंकाल!

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 16 मे 2021

राजीव सातव हे कोरोनामुक्त झाले होते मात्र, त्यांना इन्फेक्शन झाले होते, त्यांच्या शरिरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता.

पुणे : काँग्रेसचे सरचिटणीस (General Secreataty of Congress) नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. (Congress MP Rajiv Satav dies in Pune due to corona)
 
राजीव सातव हे कोरोनामुक्त झाले होते मात्र, त्यांना इन्फेक्शन झाले होते, त्यांच्या शरिरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता. त्यामुळे त्यांचे आज सकाळी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. 

कोरोनाबाधित सर्वाधिक मान्य; पण शेकडो मृतदेह नदीत सोडण्याचे कुकर्म महाराष्ट्राने केले नाही

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ''निशब्द...आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस. माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. भावपूर्ण श्रद्धांजली, काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे. अलविदा मेरे दोस्त! 

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीटकरत म्हटले आहे की, ''काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो! ॐ शान्ति

बंधूवत मार्गदर्शकाला मुकलो...! काँग्रेस पक्षाचे नेते, गुजरातचे प्रभारी खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतीव दुःख देणारे आहे. लोकांच्या प्रती प्रचंड आस्था असणारा, प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालणारा एक उमदा नेता आज पक्षाने गमावला आहे. त्यांच्या निधनाने माझी व्यक्तिगत हानी झाली आहे. माझ्या युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांची मोलाची साथ लाभली. तसेच, स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्यासह सातव यांचे आमच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असे विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्रातील उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त; शरद पवार

''मी नि:शब्द आहे..! राजीव ही जाण्याची वेळ नव्हती. तुमच्या मेहनतीची, संघर्षाची कायम आठवण येत राहील. तुम्ही लढायचा आणि जिंकायचा! मला खात्री होती यावेळीही तुम्ही जिंकाल. तुमच्या निमित्ताने लोकशाहीवर, काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा असलेला उमदा नेता आम्ही गमावला आहे'', राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, 19 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. 22 तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 23 एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल झाले. 25 तारखेला त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तर काही तक्रारींमुळे 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांच्या टीमने सातव यांच्यावरील उपचारासाठी मदत केली होती.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख