मातोश्रीच्या अंगणातच काँग्रेसकडून शिवसेनेला आव्हान 

शिवसेनेच्या वैयक्तिक पार्टी फंडातून लशी विकत घेतल्या आहेत का?
  Uddhav Thackeray, Zeeshan Siddiqui .jpg
Uddhav Thackeray, Zeeshan Siddiqui .jpg

मुंबई : मुंबईत महापालिकेच्या वतीने नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. लशींच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी महापालिकेने जागतिक निविदा काढण्याचीही तयारी केली आहे. अशातच वांद्रे पूर्व मतदारसंघात नवीन लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. या केंद्राच्या उद्घाटनावरून काँग्रेसचे (Congress) आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांनी शिवसेनेला सवाल केला आहे. (Congress MLA Zeeshan Siddiqui criticizes Shiv Sena)

वांद्रे पूर्वमध्ये नवीन लसीकरण केंद्राचे उद्घाटन शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याहस्ते करण्यात आले. या उद्घाटनाला स्थानिक मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांना निमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी आधीच नाराजी व्यक्त केली होती. लसीकरण केंद्राच्या उद्घाटनासंदर्भात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरून सिद्दीकी यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

''वांद्रे पूर्व भागात शिवसेनेने सुरू केलेल्या लसीकरण उत्सवाच स्वागत, पण इथे लसींपेक्षा जास्त पोस्टर्सच आहेत. शिवसेनेच्या वैयक्तिक पार्टी फंडातून लशी विकत घेतल्या आहेत का? कारण मला कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख दिसत नाही. लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचे उदात्तीकरण थांबवा, हे आपले कर्तव्यच आहे,'' असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे.

स्थानिक मतदारसंघाचे आमदार या नात्याने सिद्दीकी यांना निमंत्रित करणे अपेक्षित होते. मात्र त्यांना कोणतंही निमंत्रण नव्हते, त्यावरून त्यांनी  नाराजी व्यक्त केली होती. सिद्दीकी म्हणाले होते की ''स्थानिक आमदार या नात्याने प्रोटोकॉलनुसार या उद्घाटनाला मला का बोलावण्यात आले नाही? आपणही लसीकरणाबाबत राजकारण करणार आहात का?,'' असे सिद्दीकी म्हणाले होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com