मल्लिकार्जून खर्गे काॅंग्रेस नेत्यांना कानमंत्र देणार की कानउघाडणी करणार?

नाना पटोलेंच्या विरोधात तक्रारी असल्याचे चित्र
Kharge
Kharge

मुंबई  : काँग्रेसचे (Congress)  राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) सोमवारी (ता. 12 ) मुंबईत येणार आहेत. पक्षातील मंत्री, आमदारांसह प्रदेश कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, सरकारमधील कामगिरी, संघटनात्मक बांधणी जाणून घेणार असल्याचे सांगण्यात आले.

पक्षांतर्गत वाद, आघाडीतील मित्रपक्षांसोबतचे वाढलेले मतभेद पाहता खर्गे यांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता आहे. आगामी निवडणुकांतील काँग्रेसच्या स्वबळाची तयारीनंतर आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, इतर नेत्यांमधील संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर संघटना वाढविण्यासाठी आक्रमक झालेले पटोले मित्रपक्षांविरुद्ध उघडपणे बोलत आहेत. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीवरून पटोले यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नाराजी व्यक्त केली; काँग्रेसच्या नेत्यांची कामे करीत नसल्याचा ठपका पटोले यांनी पवार यांच्यावर ठेवल्याने दोन्ही काँग्रेसमधील वाद वाढणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान पटोले यांच्याशी काँग्रेसच्या काही नेत्यांचे पटत नसल्याचेही दिसत आहे. या पार्श्वभूमीवर खर्गे यांच्या मुंबई दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

दोन दिवसांपूर्वी काॅंग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी दिल्लीत जाऊन पक्षनेत्यांशी चर्चा केली होती. ही चर्चा गांधी कुटुंबियांपैकी कोणाशी झाली की नाही, हे समजू शकले नाही. पण विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड का झाली नाही, असा प्रश्न काॅंग्रेसला पडला आहे. त्यामुळे याबाबत खर्गे हे याबाबत नेत्यांची कानउघाडणी करणार का, याबाबत चर्चा आहे. तसेच स्वबळाचा नारा आघाडीतील तीनही पक्ष देत आहेत. त्याबाबत काही सल्ला खर्गे नेत्यांना देणार का, याची उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com