कॅाग्रेसचे नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन - Congress Leader and ex MP Eknath Gaikwad died due to corona in mumbai  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

 कॅाग्रेसचे नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले.  

मुंबई : कॅाग्रेसचे नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे आज निधन झाले. काही दिवसापूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर ब्रीच कॅंडी येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले.  राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत. 

एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. मनोहर जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले होते. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. ते सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय होते. 

एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई कॅाग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून एकनाथ गायकवाड यांची ओळख होती. ते २००४ आणि २००९ मध्ये निवडून आले होते. शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता.

एकनाथ गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलं होतं.  साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते.  धारावीतील बहुसंख्य लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी ते कार्यरत होते. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते. चंदनवाडी स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख