भाजपचे टुलकिट म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा..रणदीप सुरजेवाला यांचा टोला

११ मंत्र्यांच्या टि्वटला मैनुपुलेटिव मीडीयाचे टॅग देण्याची मागणी कॅाग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
Sarkarnama Banner - 2021-05-26T102500.102.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-26T102500.102.jpg

नवी दिल्ली :  कथित टुलकिट प्रकरणी कॅाग्रेसने ११ मंत्र्यांच्या टि्वटबाबत टि्वटरला पत्र पाठविले आहे. या ११ मंत्र्यांच्या टि्वटला मैनुपुलेटिव मीडीयाचे टॅग देण्याची मागणी कॅाग्रेसचे प्रवक्ता  रणदीप सुरजेवाला यांनी टि्वटरला पत्राव्दारे केली आहे. congress asks twitter to put manipulated media tag on toolkit posts of 11 union ministers

गिरिराज सिंह, पियुष गोयल, स्मृती इरानी, रविशंकर प्रसाद, प्रल्हाद जोशी, धमेंद्र प्रधान, रमेश पोखरियाल निंशक थावरचंद्र गहलोत, डॅा. ह्रर्षवर्धन. मुख्तार नकवी, गजेंद्र सिंह शेखावत आदी मंत्र्याच्या टि्वटवर कारवाईंची मागणी केली आहे.  

कथित टूलकिट प्रकरणात नोटीस बजावण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ट्विटर-इंडिया कंपनीचे कार्यालय गाठल्यानंतर, दुसऱ्या दिवशी, मंगळवारी काँग्रेसने भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली. भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांचेच ट्वीट नव्हे तर, केंद्रातील ११ मंत्र्यांच्या ट्विटचेही ‘फेरफार केलेला मजकूर’ असे वर्गीकरण केले जावे, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसने ट्विटरला पाठवले.

‘बनावट टूलकिट भाजप नेत्यांनी ट्वीट केले, गुन्हाही त्यांनीच केला आहे. दिल्ली पोलिसांनी भाजपच्या कार्यालयावर छापा टाकायला पाहिजे पण, छापा ट्विटर-इंडियाच्या कार्यालयावर टाकला गेला. हा सगळा प्रकार म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा म्हटल्या पाहिजेत’, अशी टीका सुरजेवाला यांनी केली.

भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेसच्या कथित टूलकिटच्या मजकुराचा स्क्रीनशॉट ट्वीट केला होता. या टूलकिटद्वारे काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा तसेच, देशाला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचल्याचा आरोप पात्रा यांनी केला होता. या टूलकिटमध्ये करोनाची आपत्ती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलच्या टीमने ट्विटर इंडियाच्या कार्यालयात  दोन दिवसापूर्वी छापा मारला. दिल्लीत तसेच गुरगावच्या ट्विटरच्या कार्यालयात ही छापेमारी टीमकडून करण्यात आली. त्याआधीच काल दुपारी या टीमने ट्विटरला नोटीस पाठवली होती.  दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात या कथित टूलकीट प्रकरणात ट्विटरलाही माहिती शेअर करण्यासाठी सांगितले आहे.   ट्विटरने मॅनिप्युलेटेड मिडिया हा टॅग का वापरला याचेही स्पष्टीकरण देण्याचे नोटीशीत म्हटले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने ट्विटरला मॅनिप्युलेटेड मिडिया प्रकरणात नोटीस पाठवली आहे. नरेंद्र मोदी सरकारविरोधात काही पोस्टला Manupulated media टॅग वापरल्याच्या प्रकरणातील ही चौकशीच्या निमित्ताने नोटीस पाठवण्यात आली आहे.  कॅाग्रेसचे नेते राहुल गांधी rahul gandhi यांनी कथित कोविड टुलकिट प्रकरणी आज टि्वट केलं. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की, "सत्य डरता नहीं है."  

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॅाग्रेसच्या टुलकिटवरुन टि्वट करीत कॅाग्रेसवर निशाणा साधला होता. त्याला टि्वटरने संबित पात्रा यांच्या टि्वटला बनावट, फेरफार केलेलं टि्वट असल्याचे सांगितलं होते.  कॅाग्रेसच्या या टुलकिट बाबत वकील शशांक शेखर झा यांनी याचिका दाखल केली आहे. जगात भारताची प्रतिमा खराब करणे, सरकारविषयी जनतेमध्ये अपप्रचार करणे या कारणावरुन कॅाग्रेसच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआईए)च्या माध्यमातून याचा तपास करण्यात यावा, आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्ते शशांक शेखर झा यांनी केली आहे. यात दोषी आढळल्यास कॅाग्रेसची मान्यता रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अनेक वृत्तवाहिन्या जो अजेंडा राबवत आहेत, ते टूलकिट आता मिळाले आहे. सोशल मीडियामध्ये काँग्रेसचे एक टूलकिट राबवले जात आहे. ज्यात महामारीच्या काळात कशा प्रकारे राजकारण करायचे, याचे पद्धतशीर निर्देश आहेत.  जनतेमध्ये भ्रम पसरवून त्यांना आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे.  आता काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असे संबित पात्रा यांनी म्हटलं होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com