फडणवीसांचे अभिनंदन; पण 30 वर्षांच्या तरुणाने सर्वांच्या तोंडाला फेस आणला 

तेजस्वी यादव हेपंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्र सरकारमधील मंत्र्यांविरोधात लढले.
Welcome to Fadnavis; But the 30-year-old put everyone to work: Sanjay Raut
Welcome to Fadnavis; But the 30-year-old put everyone to work: Sanjay Raut

मुंबई : "जे जिंकले, त्यांचे अभिनंदन करण्याची आमची परंपरा आहे. बिहारचे भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही अभिनंदन करणार आहोत. पण, बिहार निवडणुकीसाठी संपूर्ण केंद्रीय सत्ता कामाला लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ते 18 सभा घेतल्या. पण, तीस वर्षीय तेजस्वीने सर्वांच्या तोंडाला फेस आणला,' अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली. 

बिहार विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीचे कल स्पष्ट होत असताना राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले.

खासदार राऊत म्हणाले की, कुटुंब, आई-वडील आणि इतरांची साथ नसतानाही तीस वर्षांचे तरुण तेजस्वी यादव हे पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्र सरकारमधील मंत्र्यांविरोधात लढले. भाजप जरी एक नंबरवर असला तरी या सामन्याचे खरे "मॅन ऑफ द मॅच' हे तेजस्वीच आहेत. या निवडणुकीतून तेजस्वी यादव हे राष्ट्रीय राजकारणातील एक चेहरा म्हणून समोर आले आहेत. कुणाचाही सपोर्ट नसताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते एकटे लढले. 

"दहा लाख लोकांना नोकरी देण्याचे आश्‍वासन तेजस्वी यादव यांनी दिल्यानंतर बिहारच्या निवडणुकीतील इतर सर्व मुद्दे बाजूला पडले. त्यामुळे रोजगार, शिक्षण, विकास, आरोग्य व इतर मुद्यांवर निवडणूक आली, त्याचे श्रेय तेजस्वी यांना द्यावेच लागेल,' असे संजय राऊत यांनी सांगितले. 

बिहार निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाच्या कामगिरीबाबत संजय राऊत यांनी सांगितले की, या निवडणुकीत कॉंग्रेसला अधिक चांगली कामगिरी करता आली असती, तर आतापर्यंत तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असते. 

तसा शब्द महाराष्ट्रातसुद्धा दिला होता 

नीतीशकुमारांना शब्द दिला होता, तसा महाराष्ट्रातसुद्धा हा शब्द दिला होता. त्यांच्या उलट्या पालट्या झाला. पण, त्यानंतर शिवसेनेने जी भूमिका घेतली, त्यामुळे शब्द फिरविण्याची शक्‍यता होणार नाही. काय होऊ शकते, हे महाराष्ट्राने, शिवसेनेने देशाला दाखवून दिले आहे. त्यामुळे कमी जागा येऊनसुद्धा नीतीशकुमार मुख्यमंत्री झाले, तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे, तसेच यापुढे भाजप मित्रपक्षाशी असे वागणार नाही, असा दावाही राऊत यांनी या वेळी केला. 

नैतिकता राजकारणात राहिली नाही. ती असती महाराष्ट्रात गेल्या वर्षीसारख्या घटना घडल्या नसत्या, असा दावाही संजय राऊत यांनी या वेळी बोलताना केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com