उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलिस ठाण्यात आज तक्रार दाखल होणार... - A complaint will be lodged against Uddhav Thackeray at the police station today | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलिस ठाण्यात आज तक्रार दाखल होणार...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मार्च 2021

रेवदंडा पोलिस ठाण्यात सकाळी साडेअकरा वाजता सोमय्या तक्रार दाखल करणार आहेत.

रायगड : कोर्लई येथील जमीन खरेदी प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रवींद्र वायकर कुटुंबियांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आज पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत. 

रेवदंडा पोलिस ठाण्यात सकाळी साडेअकरा वाजता सोमय्या तक्रार दाखल करणार आहेत. या जमिनीबाबत झालेला आर्थिक व्यवहार, जमिनीचा वापर, सरकारी परवानग्या, दस्तऐवज यासंबंधी सोमय्या तक्रार दाखल करणार आहेत. 

वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुंटुबियाचा निकटवर्तीचा संबध होता असा, आरोप भाजप नेते किरीट सैामय्या यांनी काही दिवसापूर्वी केला होता. किरीट सैामय्या यांनी अन्वय नाईक यांनी कोर्लई गावात 19 बंगले बांधले होते, ते ठाकरे परिवाराचे असल्याचा आरोप किरीट सैामय्या यांनी केला होता.  

किरीट सैामय्या म्हणतात, "2009 मध्ये अन्वय नाईकने कोर्लई गावात 19 बंगले बांधले. तेव्हापासून 4 वर्ष घर प्रॉपर्टी टॅक्स अन्वय नाईकने भरला. 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2021 पर्यंतचे (8 वर्ष) घरपट्टी, पाणीपट्टी, वीज कर सौ रश्मी उद्धव ठाकरेनी भरले ठाकरे साहेब हिशोब तर द्यावाच लागेल."

अन्वय यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी त्यावेळी पोलिसांना सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 
 

हेही वाचा : भाजपच्या नेत्याची अश्लील सीडी सार्वजनिक.
 

बेळगाव : कर्नाटकमधील भाजपचे नेते, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची अश्लील सीडी सार्वजनिक झाली आहे. नोकरीचे आमिष दाखवून त्यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. बेंगलुरू येथील नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कल्लाहल्ली यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. कल्लाहल्ली यांनी सांगितले की मी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत चैाकशी करावी.

 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख