कनेक्शन लूज झाले तर रविंद्र चव्हाणांसारखे होते ; मुख्यमंत्र्यांचा टोमणा

उद्धव ठाकरे आणि कपिल पाटील यांच्या संभाषणातभाजप आमदार रविंद्र चव्हाण यांना टोला लगावल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
Sarkarnama (72).jpg
Sarkarnama (72).jpg

डोंबिवली :  कल्याण डोंबिवलीत विविध प्रकल्पांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या हस्ते पार पडला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, रवींद्र फाटक, विश्वनाथ भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्यात राजकीय महानाट्य पाहायला मिळालं.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यातील शाब्दिक चकमक आणि जागवण्यात आलेल्या युतीच्या आठवणी ही देखील या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील Kapil Patil यांच्या संभाषणात भाजप आमदार रविंद्र चव्हाण  ravindra chavan यांना टोला हाणल्याची चर्चा आता रंगू लागली आणि आता याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

धक्कादायक : परमबिर सिंह यांनी दिली सायबर तज्ज्ञाला ५ लाखाची लाच  
पालकमंत्री यांच्या भाषणानंतर केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी भाषण केले. मात्र, पाटील यांचे भाषण पालकमंत्री मंत्री याच्या आधी होते, तांत्रिक बिघाडामुळे पाटील यांचे भाषण नंतर झाले आणि मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले भाषण चालू केले. मुख्यमंत्री यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितेल की तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी तुमचा आवाज तिथे जात नव्हता, मात्र आपल्या दोघाचे कनेक्शन स्ट्रॉंग होते. त्यामुळे हे कनेक्शन स्ट्रॉंग ठेवले पाहिजे, थेट ठेवले पाहिजे. कनेक्शन लूज झाले तर रवींद्र चव्हाण यांच्यासारखे होते. लूज कनेक्शन मुळे स्पार्क होतो. दरम्यान कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना हसत सांगितले की 'टाइट करा आणि रवी चव्हाण यांचे सुद्धा टाईट करा.' मुख्यमंत्री यांनीही पाटील यांना उत्तर देत सांगितले की 'रवींद्र चव्हाण यांना टेस्टर घालून पाहतो आहे मी,' या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर उपस्थितांमध्ये हास्यांचे कांरजे उडाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मतमतांतरे आहेत, मात्र जनतेच्या हितासाठी जे आवश्यक ते करतो, हे महाविकास आघाडीचे धोरण आहे. केवळ घोषणा देणे, नारळ फोडून थांबत नाही, तर काम पूर्ण करून दाखवतो,’ असे सांगत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

युतीच्या काळातील आठवणी काढत विकासमकामांत खोडा घातला जात असल्याची खंत व्यक्त करीत भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री, आमदार आणि माजी आमदारांना मिश्किल कोपरखळ्या मारीत त्यांचा चेंडू उलटा लगावला.कार्यक्रमाच्या सुरवातीलाच आमदार चव्हाण यांचा जागेवर बसण्यावरून पोलिसांसोबत वाद झाला. त्यामुळे कार्यक्रमात आमदार नक्कीच काही तरी बोलणार, हे स्पष्ट झाले.
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com