मोदी-ठाकरेंचं गुफ्तगू; राज्यात राजकीय चर्चांना उधाण

राजकीयदृष्या आम्ही सोबत नसलो तरी आमचं नातं तुटलेलं नाही, असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
CM Uddhav Thackeray meets PM Narendra Modi before official meeting
CM Uddhav Thackeray meets PM Narendra Modi before official meeting

नवी दिल्ली : मराठा व ओबीसी आरक्षणासह राज्यातील विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पण त्याआधी या दोघांमध्ये व्यक्तिगत भेट झाली. जवळपास अर्धा तास ही भेट झाल्याची चर्चा असून त्यावरून राजकीय तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. (CM Uddhav Thackeray meets PM Narendra Modi before official meeting)

मुख्यमंत्री ठाकरे यांनीही या भेटीबाबत पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले, राजकीयदृष्या आम्ही सोबत नसलो तरी आमचं नातं तुटलेलं नाही. त्यांना भेटायचं नाही, असं काही नाही. मी नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो. आजही मी भेटलो असेन तर चुकीचे काय आहे. थोड्यावेळ व्यक्तीगत भेट झाली, आमच्यात राज्यातील प्रश्नांवर चर्चा झाली, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत पंतप्रधानांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेही उपस्थित होते. पण त्याआधी मोदी व ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली. राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे. भाजपशी काडीमोड घेऊन शिवसेने दोन्ही काँग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली आहे. सरकार स्थापनेवेळी मोठी राजकीय उलथापालथ झाली. भाजप व शिवेसनेच्या नेत्यांनी एकमेकांवर अनेक प्रहार केले. मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला होता. 

राज्यातील भाजपच्या नेत्यांकडूनही सरकार फारकाळ टिकणार नाही, अशी वक्तव्ये सातत्याने केली जात आहेत. 100 कोटी खंडणीच्या मुद्यावरून अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावाचीही चर्चा असून त्यांना अटक होईल, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. बदली प्रकरणामुळंही सरकारची डोकेदुखी वाढली आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजची मोदी व ठाकरे यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.  

मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आता पंतप्रधानांच्या कोर्टात

राज्यातील मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांसह एकूण 15 प्रश्नांवर मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये पंतप्रधानांना मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी कऱण्यात आली आहे. दोन्ही आरक्षणासाठी घटना दुरूस्ती करण्याची महत्वाची मागणी करण्यात आल्याने आता आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधानांच्या कोर्टात टाकण्यात आला आहे. 

तब्बल दीड तासांहून अधिक काळ ही बैठक सुरू होती. त्यानंतर तिघांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ठाकरे म्हणाले, राज्याचे प्रमुख विषयांसाठी पंतप्रधानांना भेटलो. त्यावर सविस्तर चर्चा झाली असून त्यांनी गांभीर्याने ऐकून घेतले. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. सकारात्मक पध्दतीने ते सोडवतील, असा विश्वास आहे. राज्यातील बारा मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com