बारा आमदारांचा तिढा सुटणार ; मुख्यमंत्र्यांची  राज्यपालांसोबत लवकरच भेट

बारा आमदारांवरील नियुक्तीबाबत राजभवनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
3Sarkarnama_20Banner_20_202021_03_24T112619.073.jpg
3Sarkarnama_20Banner_20_202021_03_24T112619.073.jpg

पुणे : विधान परिषदेच्या (Legislative Assembly) बारा आमदारांच्या (12 Mlas) नियुक्तीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. यावर राज्यपाल (Governor) भगतसिंह कोशियारी (Bhgat Singh Koshyari) यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. आता  या 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा लवकरच सुटण्याची  शक्यता निर्माण झाली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे दोन ते तीन दिवसात राज्यपालांची भेट घेणार आहेत. 

नऊ महिन्यांपासून बारा आमदारांवरील नियुक्तीबाबत राजभवनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  अजित पवार, बाळासाहेब थोरात हे भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर राज्यपाल काय कार्यवाही करतात याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. 

यापूर्वी राज्यपालांच्या भेटीची मागितली होती, पण त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ही भेट होऊ शकली नाही. सध्या राज्यपाल हे दिल्लीत असून उद्या ते मुंबईला येण्याची शक्यता आहे. त्यावेळी भेटीची वेळ दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दोन, तीन दिवसात ही बैठक होईल, असे समजते. 

बारा जणांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे यांची, तर शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे पाटील, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आदींची, तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन, अनिरुद्ध बनकर यांच्या नावांची शिफारस सरकारकडून करण्यात आलेली आहे. 

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब न झाल्याने शिवसेनेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. राज्य सरकारने 12 नावांची शिफारस करुन आता आठवा महिना लागला. राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? असा सवाल 'सामना'तून उपस्थित करण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी Bhagat Singh Koshyariयांच्याविषयी महाराष्ट्राच्या मनात व्यक्तिगत कटुता असण्याचे कारण नाही, पण राज्यपाल म्हणून त्यांचे वर्तन घटनाविरोधी व राजकीय बोटचेपेपणाचे आहे. राज्यपाल त्यांच्या पितृपक्षाच्या दबावाखाली काम करीत असतील तर पंतप्रधान मोदी यांनी घटनेची, लोकशाहीची ही घसरगुंडी रोखायला हवी. राजभवनांचा वापर करून सत्तापरिवर्तन वगैरे होत नाही व अफगाणिस्तानच्या अब्दुल गनी यांच्याप्रमाणे कोणी 'सरेंडर'ही होत नाही, हे प. बंगाल व महाराष्ट्रात दिसून आले. येथे जातीचेच आहेत हे येरागबाळ्यांनी समजून घ्यावे. राज्यपालांनी 80 व्या वर्षी पायी सिंहगड सर केला याचे कौतुक कुणाला नाही? पण लोकशाही व घटनेचा किल्ला ते पाडू पाहत आहेत! अशी टीका 'सामना'च्या अग्रलेखातून नुकतीत करण्यात आली.
  
Edited by : Mangesh Mahale


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com