मुख्यमंत्री शुक्रवारी रात्री 8.30 वाजता संदेश देणार : अंशतः लाॅकडाऊनची शक्यता

सरकार कठोर निर्णय घेण्याच्या मानसिकतेत
uddhav thackeray
uddhav thackeray

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज शुक्रवारी (2 एप्रिल) रात्री 8.30 वाजता सोशल मीडियावरून जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे हे राज्यात अंशतः लाॅकडाऊन जाहीर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या आधी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक ठाकरे हे घेणार आहेत. सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील. 

पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यात आरोग्यव्यवस्था कोसळण्याची धोका असून अनेक गरजू रुग्णांना वेळेवर बेड मिळत नसल्याची उदाहरणे दिसून येत आहे. याचाच धसका प्रशासनाने घेतला आहे. रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी लाॅकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मत प्रशासनात व्यक्त होत आहे. त्याची सुरवात आज पुण्यात करण्यात आली. 

पुणे जिल्ह्यात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या सापडू लागल्याने अखेरीस अंशतः लाॅकडाऊन लागू करण्याचा निर्णय़ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. यातील निर्णय़ांची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

  • दिवसा जमावबंदी. रात्री संचारबंदी
  • दिवसा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मनाई
  •  
  • हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल पुढील 7 दिवसांसाठी बंद
  • पीएमपीएलची सेवा सात दिवसांसाठी बंद
  • आठवडा बाजार सात दिवस बंद
  • होम डिलिव्हरी मात्र सुरू राहणार
  • लग्न, अंतिम संस्कार सोडून सर्व कार्यक्रम बंद
  • अत्यावश्यक गोष्टी सोडून सायंकाळी ६:०० ते सकाळी ६:०० सर्व गोष्टी बंद
  • सर्व धार्मिक स्थळे बंदउद्याने सकाळी सुरू रहाणार
  • उद्यापासून सर्व निर्णयांची अंमलबजावणी होणारं.
  • शाळा, कॉलेज 30 एप्रिल पर्यंत बंद  राहणार. मात्र परीक्षा वेळेत होणार

................

मुंबईतही कठोर निर्णयाची शक्यता

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही शहरात कडक निर्बंध आणण्याची गरज व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की मुंबईत आता रुग्ण वाढत आहेत. रुग्णालयातील खाटा पूर्ण भरत चालल्या आहेत. त्यामुळे काळजी वाढली आहे. काही लोक नियम पाळत नाहीत. टाळेबंदी कोणालाच नकोय. पण आरोग्य यंत्रणेवरील बोजा कमी करायचा असल्यास, आपल्या अधिक काळजी घ्यायला हवी. महापौरांच्या या वक्तव्यानंतर मुंबईतही कडक निर्बंध येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com