मुख्यमंत्री ठाकरे हायकोर्टाची पायरी चढले..... पण या कारणासाठी!

मुख्यमंत्री न्यायालयात जाणे ही तशी अवचित घटना
uddhav -high court
uddhav -high court

मुंबई : कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीत देशातील सर्वोच्च (Supreme court) आणि उच्च न्यायालये (Bombay High Court) सक्रिय झाली असून रोज केंद्र आणि राज्य सरकार यांना न्यायालयाचे फटके खावे लागत आहे. सरकारांच्या कोरोना स्थिती हाताळण्यावरून न्यायालये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत असल्याची स्थिती असताना आज अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. (CM Uddhav Thackeray meets Chief Justice of Bombay High Court)

खुद्द मुख्यमंत्रीच न्यायालयात जाणे, हे ब्रेकिंग न्यूज ठरली. समन्स नाही, कोणती नोटीस नाही किंवा त्याची साधी कुणकुणही नाही, असे असताना ठाकरे हे न्यायालयात कशासाठी गेले असतील, असा प्रश्न अनेकांना पडला. त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त इक्बाल चहल आणि महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे देखील होते. त्यामुळे साहजिकच मुंबईतील कोरोना स्थितीबाबत न्यायालयात काही सुनावणी आहे का, अशी शंका वाटून गेली. सर्वच न्यूज चॅनेलच्या `न्यूज रूम`मधील फोन अॅक्टिव्ह झाले. कोणता जुना खटला नाही ना, याची माहिती जमा करण्यास सुरवात झाली. पण तसेही काही हाती लागले नाही.

पण साऱ्या गडबडींवर थोड्याच वेळात प्रकाश पडला आणि मुख्यमंत्र्याची ही सदिच्छा भेट होती. मुख्यमंत्री कोर्टाची पायरी चढले ते तेथे सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी. मागील तीन दिवसांपासून मुंबई हायकोर्टात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. मुख्यमंत्री, मुंबई महापालिका आयुक्त यांनी मुख्य न्यायाधीश यांची दीपंकर दत्ता यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट पूर्वनियोजित होती. तेथे चहापान झाले आणि मुख्यमंत्री निघाले. त्यानंतर हे चहाच्या पेल्यातील संभाव्य वादळ तेथेच विरले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com